नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fuel Price Hike |देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज वाढत (Fuel Price Hike) आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई आणि देशातील इतर राज्यात पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत. इंधन दरवाढीमुळे (Fuel Price Hike) जनसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्याने महागाई वाढत आहे. यातच आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी केंद्राला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
rbi governor shaktikanta das react fuel price hike
इंधनावरील कर कमी करा
इंधन दरवाढीबाबत बोलताना दास म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलवरही खूप कर (Tax) आहे. इंधनावरील कर कमी केल्यास पेट्रोल-डिझेलच्या (petrol-diesel) किंमती खाली येऊ शकतात. तसचे इंधनावरील कर कमी करण्याचा सल्लाही त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. अर्थव्यवस्थे(Economy)ला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणायचे असून, आणि महागाई नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. सातत्याने इंधनदरवाढीमुळे महागाई(Inflation) वाढत चालल्याचे दास यांनी म्हटले आहे.
म्हणून पेट्रोल-डिझेल महाग
जागतिक स्तरावर कच्चा तेलाच्या वाढत्या किमतीचे थेट परिणाम देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर होत आहेत. अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह(The US Federal Reserve)च्या धोरणाचा परिणाम भारतासह सर्व अर्थव्यवस्थांवर होत आहे. भारताचा परकीय चलन साठा(Foreign exchange reserves) 609 अब्ज डॉलर्स असल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली.
RBI ला महागाई दर 4 टक्के असणे अपेक्षित
शक्तिकांत दास पुढे म्हणाले, आरबीआयला महागाईचा दर चार टक्के असणे अपेक्षित आहे. यामुळे गुंतवणूकदारांमधील अनिश्चितता कमी होईल. याशिवाय विकासाला बळ मिळू शकेल. मागील महिन्यात सरकारने लहान व्यापाऱ्यांसाठी कर्जावरील हमी देण्याची घोषणा केली होती. आरोग्य व पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. याचा फायदा होईल, असेही शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.
web title : Fuel Price Hike | It is possible to reduce petrol-diesel rates, RBI governor gave important advice to the Center
Online Class | ऑनलाइन क्लासमध्ये कपलचा सेक्स; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल