बेंगळुरू : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (खडठज) ने शुक्रवारी युरोपीय अंतराळ संस्थेच्या एरियन-5 प्रक्षेपण यानाच्या माध्यमातून संचार उपग्रह जीसॅट-30 प्रक्षेपित केला आहे. भारतीय वेळेनुसार 2 वाजून 35 मिनिटाने जीसॅट-30 ला एरियन-5 च्या माध्यमातून पाठविण्यात आले.
Communication satellite, GSAT30 onboard Ariane-5 flight was launched from Kourou launch base in French Guiana. https://t.co/gX1adHVMrk
— ANI (@ANI) January 16, 2020
जीसॅट-30 इन्सॅट-4 ए ची जगा घेईल आणि त्याची कव्हरेज क्षमता जास्त असेल. इन्सॅट-4 ए ला 2005 सालात प्रक्षेपित करण्यात आले होते. त्याचे वजन 3357 किलोग्रॅम आहे. हा उपग्रह केयू बँडमध्ये भारतीय भू भाग आणि द्वीपांसह, सी बँडमध्ये खाडी देश, मोठ्याप्रमाणात आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियाला कव्हरेज देतो. हा भारताचा 24वा असा उपग्रह आहे, ज्यास एरियन स्पेसवरून एरियन रॉकेटने प्रक्षेपित करण्यात आले आहे.
30 वर्षांचा मिशन कालावधी असलेला जीसॅट उपग्रह डीटीएच, टेलीव्हिजन अपलिंक आणि व्हीसॅट सेवांसाठी महत्वाचा संचार उपग्रह आहे. इस्त्रोन म्हटले की, जीसॅट-30च्या संचार पेलोडला या आंतराळ यानात जास्त ट्रान्सपोंडर लावण्यासाठी विशेष पद्धतीने तयार करण्यात आले आहे. त्यानुसार याचा उपयोग मोठ्या प्रमाणात व्हीसॅट नेटवर्क, टेलीव्हिजन अपलिंकिंग, टेलीपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट माहित संग्रह (डीएसएनजी), डीटीएच टेलीव्हिजन सेवा आदीसाठी करण्यात येणार आहे.
Visit : bahujannama.com