चंदीगड : बहुजननामा ऑनलाईन टीम – आता कार तसेच अन्य गाडीत बसून ब्लूटूथने मोबाइलवर बोलल्यास चंदीगड पोलीस दंडाची पावती फाडणार नाहीत. यापूर्वी यासाठी पावती फाडली जात होती. चंदीगड पोलीसांनी सर्व अधिकार्यांना निर्देश दिले आहेत की ब्लूटूथने गाडीमध्ये मोबाइलवर बोलणार्या लोकांना दंड आकारू नका.
सर्व वाहतूक आधिकार्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रशासनाने तयार केलेल्या रोड सेफ्ट कमिटीकडे सुद्धा याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. यानंतर पोलिसांनी नवीन मोटर व्हेईकल अॅक्टचा अभ्यास करून हे स्पष्टीकरणे दिले आहे.
नोटीफिकेशन स्पष्ट केले आहे :
चंदीगडचे एस. एस. पी. शशांक शेखर आनंद यांनी स्पष्ट केले की नव्या मोटर वाहन कायद्यात गाडी किंवा कारमध्ये जर ब्लूटूथ इनबिल्ट असेल आणि त्याद्वारे कुणी मोबाईलवर बोलत असेल तर वाहतूक पोलीस दंड आकारू शकत नाही.
जर कुणी व्यक्ती गाडीमध्ये अथवा दुचाकी वाहनावर बसून मोबाईल कानाला लावून बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. नव्या मोटर वाहन कायद्याची जी नोटीफिकेशन चंदीगड प्रशासनाने जारी केली आहे, त्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, ब्लूटूथद्वारे मोबाइलवर बोलल्यास चलन केले जाणार नाही. याच आधारावर वाहतूक पोलिसांना हे निर्देश देण्यात आले आहेत.
नवा कायदा आल्यानंतरही दंड आकारत होते पोलीस
नवीन मोटर वाहन कायदा आल्यानंतरही ब्लूटूथद्वारे मोबाइलवर बोलणार्या शेकडो वाहन चालकांना पोलिसांना दंड आकारला आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो की, दंड म्हणून आकारण्यात आलेली ही रक्कम वाहतूक पोलीस परत करणार का? हा वाद जेव्हा निर्माण झाला होता तेव्हा काही जागरूक नागरिकांनी पत्र पाठवून प्रश्न विचारला होता की, ब्लूूटूथवर बोलल्याने दंड होऊ शकतो तर बाईक अथवा कारवर जी.पी.आर.एस. चे लोकेशन लावून सतत त्याकडे लक्ष देणार्यांवर वाहतूक पोलीस कारवाई का करत नाहीत? यास वाहतूक पोलीस कायदेशिर कसे ठरवतात?
एस. एस. पी. म्हणाले, पण दूर रहा
एस.एस.पी. वाहतूक शंशांक म्हणाले, ब्लूटूथद्वारे मोबाइलवर बोलल्यास दंड आकारला जाणार नसला तरी वाहन चालकांना विनंती आहे की, त्यांनी यापासून दूर रहावे. मोबाइल अथवा ब्लूटूथ किंवा टेक्स्ट मेसेजमुळे लक्ष विचलित होते, यामुळे स्वत:ची तसेच दुसर्यांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.