नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृह मंत्रालायाकडून पैरा मिलिट्री सर्विस पॅकेज कार्ड अपग्रेड करण्यात आले आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या 10 लाखाहून अधिक सैनिक आणि अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यांना एकाच कार्डावर अनेक सुविधा मिळणार आहेत. विविध कर्ज सुविधांव्यतिरिक्त सीएपीएफ कर्मचार्यांचे विमा संरक्षणही वाढविण्यात आले आहे. या अंतर्गत सुभेदार मेजर यांना 75 हजार रुपये, सहाय्यक कमांडंट, डेप्युटी कमांडंट दीड लाख रुपये आणि त्यावरील सर्व पदांवर दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम देण्यात येणार आहे. एअर अॅक्सिडेंटल डेथ कव्हर 1 कोटी रुपये ठेवण्यात आले आहे.
या सर्व सुविधा गृह मंत्रालयाच्या कराराअंतर्गत एसबीआय द्वारा प्रदान करण्यात येतील. योजनेचा कालावधी 4 जानेवारी 2020 ते 3 जानेवारी 2021 पर्यंत असेल. यानंतर या योजनेचे नूतनीकरण झाल्यानंतरच वरील सुविधा सुरू राहू शकतील. सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, एनएसजी, एसएसबी, आयटीबीपी आणि आरपीएसएफ कर्मचार्यांना त्यांच्या श्रेणीनुसार स्वतंत्र डेबिट कार्ड दिले जात आहेत. सुभेदार मेजरपर्यंतच्या कर्मचार्यांना गोल्ड कार्ड मिळेल, तर डेप्युटी कमांडंट व सहाय्यक कमांडंट यांना डायमंड कार्ड तर टीओआयसी ते डीजीपर्यंतच्या अधिकाऱ्यांना प्लॅटिनम कार्ड दिले जाईल. या कार्डचे सर्व फायदे निवृत्तीवेतनधारकांनाही उपलब्ध असतील. परंतु, निवृत्तीवेतनधारकांना वैयक्तिक अपघात कव्हर विम्याची सुविधा देण्यात आलेली नाही.
काय असतील फायदे
*एका महिन्यात कोणतीही निश्चित सरासरी रक्कम ठेवण्याची गरज नाही.
*लाइफ टाइम युनिक खाते क्रमांक प्रदान केला जाईल.
*वैयक्तिक अपघात विमा रू. 30 लाख
*1 कोटी रुपयांचा एअर अपघात विमा
*कायमस्वरूपी अपंगत्वावर 30 लाख
*आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख
*जळल्यास प्लास्टिक सर्जरीसाठी दोन लाख रुपये
*इंर्पोटेड औषधे आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च, एक लाख
*अपघातानंतर कोमा आणि मृत्यू झाल्यास दोन लाख
*मुलांसाठी पदवी स्तरावरील शिक्षणावर चार लाख रुपये
*मुलींच्या विवाहासाठी दोन लाख रुपये
*अपघाताच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कुटुंबातील दोन सदस्यांना 20 हजारांपर्यंत वाहतुक खर्च
*एंबुलेंस चार्जेज 1,500 रुपये
इंटरनेशनल गोल्ड डेबिट कार्ड आणि प्लॅटिनम डेबिट कार्डवरील वैयक्तिक अपघात विमा मृत्यू कव्हर व्यतिरिक्त, दोन लाख आणि पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध असेल.तसेच, चार लाख दहा लाख रुपयांचे हवाई अपघात कव्हरही स्वतंत्र केले जाईल. कार्ड हरवल्यास 80 हजार आणि 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. इंटरनेशनल गोल्ड डेबिट कार्डच्या माध्यमातून एकावेळी 50 हजार रुपये काढता येतात, तर प्लॅटिनम डेबिट कार्डे असलेल्यांसाठी एक लाख रुपयांपर्यंतची व्यवहार मर्यादा ठेवली गेली आहे.
Visit : bahujannama.com