बहुजननामा ऑनलाइन इस्लामाबाद : जम्मू – काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यामुळे पाकिस्तान बिथरल्यासारखे करत आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानची मुजोरी वाढत चालली आहे. त्यात आता पाकिस्ताननं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे विमानाला हवाई हद्दीतून जाण्यास मनाई केली आहे. दरम्यान , सोमवारपासून राष्टपती कोविंद हे आइसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, पाकिस्ताननं कोविंद यांच्या विमानाला हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास नकार दिला. यासांदर्भातील माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली.
राष्ट्रपती कोविंद हे सोमवार ८ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरपर्यंत आइसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाऊ द्यावे, अशी परवानगी भारतानं मागितली होती. पण ही परवानगी पाकिस्तानने नाकारली आहे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील या निर्णयाला सहमती दर्शवली असल्याचं कुरेशी यांनी सांगितले. तसेच काश्मीरमधील तणावपूर्ण स्थितीमुळं हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक करून बालाकोटमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर भारतीय विमानांसाठी पाकिस्ताननं त्यांची हवाई हद्द पूर्णपणे बंद केली होती. त्यानंतर मार्चमध्ये त्यांनी हवाई हद्द खुली केली होती. परंतु पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद केली आहे.
- विषयक वृत्त आरोग्य
- दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत