बहुजननामा ऑनलाइन हरियाणा : पंजाबमधील संगरूरमधील गुरजारा गावात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाने आपल्याच गावातील एका मुलीबरोबर बंदुकीची गोळी झाडून नंतर स्वतः आत्महत्या केली. या दोघांनीही मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये त्यांनी पोलिसांना संदेश दिला की, पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये. ते स्वत: च्या इच्छेनुसार आयुष्य संपवत आहे. मुलाने सोशल मीडियावर लाईव्ह विडिओ करत मुलीला प्रथम गोळी मारून नंतर स्वत: ला गोळी घातली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. मृत्यूपूर्वी, एक व्हिडिओ बनविला गेला होता ज्यामध्ये दोघांच्या चेहऱ्यावर मृत्यूची अजिबात भीती नव्हती . मुलाने हा प्रकार आपल्या फार्महाऊसवर जाऊन केला . मध्यरात्रीनंतर, तो रात्री दीड वाजेच्या सुमारास लाईव्ह विडिओ सुरु केला . त्यानंतर मुलीला दोन गोळ्या घातल्या आणि नंतर त्याने स्वत: ला घशाच्या खाली गोळी झाडली.
दिड्डाचे डीएसपी विल्यम जेजी म्हणाले की, दोघेही मृत व्यक्ती एकाच गावचे आहेत. मुलगी बीए शिकत आहे. मुलगा बारावी पास असून शेवटच्या वर्षाला आहे. दोघांनीही रात्री उशिरा गावाबाहेर फार्म हाऊसवर जाऊन लाईव्ह व्हिडिओ बनवून आणि सोशल मीडियावर टाकल्यानंतर या दोघांनी बंदुकीच्या सहाय्याने स्वत: ला ठार मारले.
डीएसपी विल्यम जेजी म्हणाले की, प्राथमिक तपासणीत मुलीला काही भयंकर आजार असल्याचे आढळले आहे, ज्यामुळे दोघांनीही हे भयंकर पाऊल उचलले.