बहुजननामा ऑनलाईन – चांद्रयान २ शी इस्रोचा संपर्क तुटला असला तरी शास्त्रज्ञांनी अजून आशा सोडली नाहीये. ते पुन्हा विक्रम लाँडरश पुन्हा संपर्क होईल या आशेवर वैज्ञानिक त्यांचे प्रयत्न न सोडता कार्यरत आहेत.
इस्रोच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विक्रमची सद्य स्थिती पाहण्यासाठी ऑर्बिटरच्या मदतीने त्याची छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे विक्रम लाँडरच्या उड्डाण डेटा रेकॉर्डरच्या साहाय्याने २.१ किमी उंचीवर असताना त्याचा मार्ग कसा भरकटला याचा शोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करीत आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावरुन २.१ किमी उंचीवर विक्रम लॉंडर त्याच्या निश्चित मार्गापासून दूर गेला होता. यानंतर तो ६० मीटर प्रति सेकंदाच्या वेगाने ३३५ मीटरवर पोहचला आणि नेमका याच ठिकाणी त्याचा पृथ्वीवरील इस्रो सेंटरशी संपर्क तुटला.
शास्त्रज्ञांनी अशी शंका व्यक्त केली आहे की, ज्या वेगाने विक्रम लॅंडर खाली उतरत होता त्याने त्याच वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर त्याची धडक झाली असावी. मात्र लँडर मधूनमधून चंद्राच्या कक्षाशी जोडत असल्याने लँडरच्या संपर्कात येण्याची आशा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. भविष्यात विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर किती काम करतील, हे डेटा विश्लेषणानंतरच कळेल. मात्र विक्रम लॅंडरचा चंद्राच्या पृष्ठभागावरुन २.१ किमी उंचीवर असताना त्याच्या मार्गावरुन कसा भरटकला, याचा शोध इस्रोचे वैज्ञानिक घेत आहेत. शास्त्रज्ञांनी विक्रमशी संपर्क तुटण्याचे एक कारण असेही सांगितले आहे की, विक्रम लँडरच्या बाजूला बसविलेल्या लहान ४ स्टीयरिंग इंजिनांपैकी कोणत्या एका इंजिनने काम केले नसावे. यामुळे विक्रम लँडरने आपला मार्ग गमावला आणि संपूर्ण संपर्क तुटण्याला इथूनच सुरू झाली. म्हणून वैज्ञानिक या मुद्द्याचा अभ्यास करत आहेत.
चंद्राच्या भोवती फिरणाऱ्या कक्षामध्ये ऑप्टिकल हाय रिझोल्यूशन कॅमेरा (ओएचआरसी) वरून विक्रम लाँडरचा फोटो काढला जाईल. हा कॅमेरा चंद्र पृष्ठभागावर ०.३ मीटर किंवा १.०८ फूटांपर्यंतच्या कोणत्याही गोष्टीचे स्पष्ट छायाचित्र घेऊ शकतो. यातून मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे विक्रम लँडरचे किती नुकसान झाले याची माहिती मिळेल. तथापि, लँडर आणि ऑर्बिटर वेगवेगळ्या कक्षेत फिरत असल्याने ऑर्बिटरला लँडरच्या समोरच्या कक्षामध्ये प्रवेश करण्यास थोडा वेळ लागेल. ऑर्बिटर लॅंडरच्या समोर आल्यास तो त्याच्या पायावर उभा आहे? प्रज्ञान रोव्हर बाहेर येऊ शकतो का, तो भविष्यात काम करण्यास सक्षम असेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे केवळ डेटा विश्लेषणाच्या अहवालावरुन स्पष्ट होऊ शकतील. शेवटी… फक्त एक गोष्ट उरली आहे… ती आशा आहे.
- विषयक वृत्त आरोग्य
- दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत