नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – नांदेड जिल्ह्यात अनेक दिवसा पासून लाच घेण्याचे प्रकार सुरूच आहे अधिकारी लाच घेणे सोडत नसल्याने ज्यांना देण्याची इच्छा नाही अशे अनेक जण तक्रार करत असतात त्या तक्रारी वर मोठं मोठी गुन्हे दाखल होऊन देखील भीती संपली आहे असे चित्र दिसत आहे.नुकतेच नांदेड शहरात येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात कार्यरत निरीक्षक गंगाधरपंत नांदेडकर हा १० हजाराची लाच घेताना जाळ्यात अडकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दि २०फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ही कारवाई करत त्याला रंगेहात पकडले. त्याच्याविरूध्द वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात राहणाऱ्या एका पुजाऱ्याची चौकशी या कार्यलयाकडे होती. त्यासाठी संबंधीत पुजारी हा या कार्यालयात खेटे मारत होता. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे म्हणणे नोंदवून दिवानी न्यायाधिश यांच्या आदेशाची प्रत जबाबसोबत स्विकारून वरिष्ठांकडे अनुकूल अहवाल सादर करण्यासाठी लाचखोर निरीक्षक गंगाधरपंत धोंडिबाराव नांदेडकर यांनी १५ हजाराची लाच मागितली. तडजोडअंती ती १० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र ही लाच देऊ नय इच्छिणाऱ्या पुजारी तक्रारदाराने ए सी बी कार्यालयात तक्रार दिली. यावरून पडताळणी सापळ्यातच निरीक्षक नांदेडकर हा सहाय्यक धर्मादाय आयुक्त या आपल्याच कार्यालयात १० हजाराची लाच घेताना रंगेहात सापडला.त्याच्याकडून घेतलेली लाचही जप्त केली. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कपील शेळके यांच्या पथकांनी परिश्रम घेतले.ह्या कार्यवाही ने त्या कार्यलय मध्ये कामाला येणाऱ्या सर्वाना आनंद झाला आहे.