उपनगराध्यक्ष व नगरसेविकांच्या अपात्रतेच्या आदेशाला दिली स्थगिती
नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपरिषद येथे काँग्रेसच्या तीन नगरसेवकांना नगराध्यक्ष निवडीच्या वेळी तिसऱ्या आघाडीच्या मतदान करून पक्षासोबत बंडखोरी केल्या प्रकरणी जिल्हाधीकाऱ्यांनी त्यांना अपात्र घोषित केले होते या आदेशाला काल दि 21 फेब्रुवारी रोज बुधवारी नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटिल यांनी काल स्थगिती दिली आहे त्यामुळे उपनगराध्यक्ष मो.जावेद गणि,नगरसेविका शमीमबानो अनवर खान पठाण,व सुरेखा सदाशिव सातव यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे
हिमायतनगर नगर पंचायतच्या पहिल्या नगराध्यक्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गाला सुटले होते त्या वेळेस माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना संधी नदेता आपल्या मर्जीतील मा.नगराध्यक्ष अ.अखिल यांना संधी दिल्या मुळे नाराज झालेल्या व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस च्या तीन नगरसेवकांनि तिसऱ्या आघाडीच्या शिवसेनेला मतदान करून नगराध्यक्षपद कुणाल राठोड तर उपनगराध्यक्ष पद स्वतः हा कडे ठेवले होते ह्या प्रकरणी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी त्या तिन्ही नगरसेवकांना अपात्र ठरवून पुढील सहा वर्षासाठी निवडणूक लढविता येणार नसल्याचे आदेश दिले होते या प्रकरणी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटीलयांनी काल दि.२० फेब्रुवारी रोजी त्या पदावर स्थगिती दिली आहे त्यामुळे हिमायतनगर येथील नगर पंचायत च्या नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे स्थगितीचे व्रत समजताच हिमायतनगर शहरात नगराध्यक्ष कुणाल राठोड व उपनगराध्यक्ष मो.जावेद हा.अ. गणि यांच्या चाहत्यानी शहरात ठीक-ठिकाणी आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला