भोकर : (माधव मेकेवाड) : बहुजननामा ऑनलाईन – आयसीटी योजने अंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या संगणक शिक्षकांना कायम स्वरूपी सेवेत सामावून घेण्या संदर्भात केंद्राला पाठवण्यात आलेल्या प्रस्तावा बाबत लोकसभेत निर्णायक चर्चा घडुण यावी याकरिता नांदेड जिल्ह्यातील आयसीटी संगणक शिक्षकांच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार शरदचन्द्रजी पवार साहेबांसह,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब, लातूर चे खासदार सुनील गायकवाड साहेब व माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे साहेब यांना
देशभरातील शालेय विद्यार्थ्याना संगणकाचे मोफत मिळावे याकरिता केंद्राकडून आयसीटी ही योजना ५ वर्षासाठी सुरू केली होती.या योजनेसाठी केंद्र सरकारने ७५ टक्के व राज्य सरकारने २५ टक्के खर्च करावा अशी तरतूद केली होती व या योजने अंतर्गत खाजगी कंपनी च्या वतीने संगणकाचे शिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांची ५ वर्षांकरिता संगणक शिक्षक म्हणून नियुक्ती केली होती आणि राज्यात या योजनेचा कार्यकाळ संपल्याने राज्यातील ८ हजार संगणक शिक्षकांना कामावरून काढून टाकण्यात आले तदनंतर संगणक शिक्षकांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी महाराष्ट्रराज्य सर्वश्रमिकसंघटना व राज्यातील ८ हजार संगणक शिक्षक मागील ४ ते ५ वर्षापासून शिक्षण विभागाकडे मागणी केलेली आहे.राज्यातील ८ हजार संगणक शिक्षकांना सेवेत सामावून घेण्यात येईल असे आश्वासनही मा.शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांच्याकडून वेळोवेळी मिळत आले अशावेळी शासनाकडून संगणक शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे साहेब, आमदार दतात्र्य सा सावंत साहेब, आमदार नागोराव गाणार साहेब, ज.मो.अभ्यंकर साहेब यांनी संगणक शिक्षकांच्या न्याय हकाच्या मागणीला पाठिंबा देवून मा.प्रकाशजी जावडेकर साहेब मनुष्यबळ विकास विभागाकडे (केंद्राकडे )प्रस्ताव पाठवण्यासाठी भाग पाडले या शिक्षकांना कायम स्वरूपी सेवेत सामावून घेण्या संदर्भात पाठवण्यात आलेल्या प्रस्तावा बाबत लोकसभेत निर्णायक चर्चा घडुण यावी व आपल्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण व्हावेत म्हणून आज दिनांक २० फेब्रुवारी २०१९ बुधवार रोजी नांदेड येथील संगणक शिक्षकांच्या वतीने मा.माजी केंद्रीय कृषी मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार शरदचन्द्रजी पवार साहेब,महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री, कॉंग्रेसप्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान खासदार नांदेड अशोकराव चव्हाण साहेब,खासदार सुनील गायकवाड साहेब लातूर लोकसभा, माजी खासदार जोगेंद्रजी कवाडेसाहेब यांना देण्यात आले या वेळी नांदेड जिल्हा प्रमुख गजानन देवाने सर, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र कांबळे सर, भोकर व हिमायतनगर तालुका प्रमुख सिद्धार्थ जाधव सर,नांदेड शहर प्रमुख शंकर पितळे सर, आनंता पांडे सर, रामजी लांडगे सर, राजेश राऊत सर,सौ.विजया शिवपुजे मेडम, प्रदीप बूक्तरेसर, चिंचबनकर सर, रघुनाथ आंबटवाड,रामगीरवाड मेडम, शेख फैजुद्दीणसर आदी नांदेड जिल्ह्यातील संगणक शिक्षकांची उपस्थिती होती.