Indians Deposit In Swiss Banks | नोटबंदी ठरली कुचकामी ! 14 वर्षात सर्वात जास्त झाला स्विस बँकेत भारताचा पैसा; 2021 मध्ये 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indians Deposit In Swiss Banks | काळ्या पैशाला (Black Money) आळा घालण्यासाठी भारत सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदी (Demonetisation) केली होती. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरेल, असे तेव्हा सांगण्यात आले. मात्र, आकडेवारीवर नजर टाकली तर या प्रकरणात नोटाबंदी कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. (Indians Deposit In Swiss Banks)
काळ्या पैशाचे आश्रयस्थान मानल्या जाणार्या स्विस बँकांमधील (Swiss Banks) भारतीयांच्या ठेवी गेल्या वर्षी विक्रमी वेगाने वाढल्या आणि 14 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या. सेंट्रल बँक ऑफ स्वित्झर्लंड (Switzerland’s Central Bank) च्या वार्षिक अहवालात ही माहिती समोर आली आहे.
इतके वाढले स्विस बँकेत इंडियन डिपॉझिट
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सेंट्रल बँक ऑफ स्वित्झर्लंडने गुरुवारी वार्षिक अहवाल जारी केला. 2021 मध्ये स्विस बँकांमधील भारतीय नागरिक आणि कंपन्यांच्या ठेवींमध्ये 3.83 अब्ज स्विस फ्रँक (Swiss Franc) म्हणजेच 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त (INR) वाढ झाल्याचे अहवालात सांगण्यात आले.
याच्या एक वर्षापूर्वी 2020 च्या अखेरीस ते फक्त 2.55 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच सुमारे 20,700 कोटी रुपये होते. याचाच अर्थ गेल्या वर्षी स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा जवळपास 50 टक्क्यांनी वाढला आहे. (Indians Deposit In Swiss Banks)
अशाप्रकारे जमा करतात भारतीय लोक
माहितीनुसार, स्विस बँकेत भारतीय लोकांचे बचत खाते (Saving Account) आणि ठेवी खात्यात (Deposit Account) जमा केलेली रक्कम सुमारे 4,800 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही सात वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे.
सलग दोन वर्षे घसरल्यानंतर 2021 मध्ये वाढ झाली आहे.
भारतीय लोक आणि कंपन्या अनेक माध्यमातून स्विस बँकेत पैसे जमा करतात.
त्यामध्ये कस्टमर डिपॉझिट (Customer Deposit), बँक (Bank), ट्रस्ट (Trust), सिक्युरिटी (Security) ही माध्यमे प्रमुख आहेत.
2006 नंतर फक्त पाच वर्षांनी ठेवी वाढल्या
स्वित्झर्लंडच्या सेंट्रल बँकेने म्हटले आहे की भारतीय स्विस बँकांमध्ये बाँड, सिक्युरिटीज आणि इतर आर्थिक उपायांद्वारे सर्वात जास्त पैसे जमा करतात. या पद्धतींमुळे, स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवी 2,002 दशलक्ष स्विस फ्रँक झाल्या आहेत,
2020 च्या अखेरीस 1,665 दशलक्ष स्विस फ्रँक होत्या.
2006 च्या सुरुवातीला स्विस बँकेत भारतीयांचा पैसा शिखरावर होता आणि त्यानंतर त्याचा आकडा सुमारे 6.5 अब्ज स्विस फ्रँक होता. त्यानंतर बहुतांश वर्षे त्यात घट झाली. बँकेनुसार 2011, 2013, 2017, 2020 आणि 2021 ही वर्षे अशी होती,
जेव्हा स्विस बँकेत भारतीयांच्या ठेवी वाढल्या होत्या.
Web Title :- Indians Deposit In Swiss Banks | indians deposit in swiss banks jumps last year now standing at 14 years high level
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Pune Crime | पुण्यात घरफोडीसह वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, 4.75 लाखाचा मुद्देमाल जप्त
- PMJJBY आणि PMSBY मधून कसे बाहेर पडावे ? किंवा आपल्या बँक अकाऊंटमधून कसे Deactivate करावे
- Ajit Pawar | अजित पवारांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही भरते धास्ती
Comments are closed.