Ajit Pawar | अजित पवारांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही भरते धास्ती

Ajit Pawar | maharashtra government officers have fear about ajit pawar anger

सातारा / कराड : बहुजननामा ऑनलाइन – Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या दमदार बोलण्याच्या शैलीवरुन ओळखले जातात. त्यांचा सडेतोड बोलण्याचा स्वभाव, स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच माहित आहे. नुकतंच कोयनानगर (Koynanagar) येथील विश्रामगृहाचे उद्घाटनप्रसंगी सरकारी अधिकाऱ्यांना यावेळी अजित पवारांनी खडेबोल सुनावले. त्याचबरोबर हलगर्जीपणा दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही त्यांनी चांगलेच सुनावले. दर्जाहीन बांधकाम, त्यातील वाढीव खर्चासाठी केलेले उद्योग, सजावटीखाली चुकांवर घातलेले पांघरूण याची अजित पवारांनी पोलखोल केली आणि यासंदर्भात अधिकारी-पदाधिकारी दोघांना देखील चांगलेच धारेवर धरले आहे.

काही दिवसांपुर्वी कोयनानगर येथे दीड कोटी रुपये खर्चाच्या नव्या शासकीय विश्रामगृहाचे (Government Rest House) उद्घाटन अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उद्घाटन केल्यावर वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांसमवेत ते या विश्रामगृहाची पाहणी करत होते. या दरम्यान अजित पवार यांचे संबंधित बांधकामातील त्रुटींवरच अधिक लक्ष होते. याच त्रुटी, दर्जाहीन बांधकाम, त्यातील वाढीव खर्चासाठी केलेले उद्योग, सोयीसुविधांची नेमकी गरज, त्यातील भोंगळपणा त्यांनी थेट उपस्थित लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. त्यावेळी त्यांनी व्यासपीठावरील उपस्थित मंत्री व खासदार आणि आमदारांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करूनही दिली.

“जनतेच्या पैशाचे अशा कामातून वाटोळे करणाऱ्यांना नरकात पाठवा; तुम्हाला कामाची गुणवत्ता व लोकांच्या पैशाचे मूल्य समजायला हवे,’” असे सुनावताना, जिथे उत्तम काम होते त्याचे कौतुकच करतो. पण, जिथे दर्जाहीन कामे होतात तिथे उघडपणे कडक प्रतिक्रियाही व्यक्त करत असल्याचे सांगत अजित पवार यांनी कोयनानगरच्या शासकीय विश्रामगृहाच्या कामाच्या चौकशीचे आदेश देखील दिले आणि कोयनेचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे (Sanjay Doiphode) यांच्या कार्यपद्धतीचा त्यांनी समाचार घेतला. दरम्यान, यापूर्वी त्यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची उदाहरणे आहेत. अजित पवारांचा हा स्पष्टवक्तेपणा अनेक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना धास्ती भरवणारा आहे.

Web Title :- Ajit Pawar | maharashtra government officers have fear about ajit pawar anger

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update