नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात सध्या टिकटॉक या शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅपने धुमाकुळ घातला असून शहरी आणि ग्रामीण भागात याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. टिकटॉकवर अँड्रॉइड युजर्स असलेल्या भारतीयांनी 2018 मध्ये एकुण 900 मिलियन म्हणजेच 9 कोटी तास घालवले आहेत. तर 2019 मध्ये 5.5 अब्ज तास टिकटॉकवर घालवले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतीत टिकटॉकने फेसबुकलाही मागे टाकले आहे. 2018 च्या तुलनेत टिकटॉकवर भारतीय यूजर्सची तब्बल 6 पटींनी वाढ झाली आहे. मोबाइल आणि डेटा अॅनालिटिक्स फर्म अॅप अॅनी ने ही माहिती दिली आहे.
आप खुप मोठा मौल्यवान वेळ लाखो भारतीय टिकटॉकसारख्या अॅपवर घालवत असल्याचे मोबाइल आणि डेटा अॅनालिटिक्स फर्म अॅप अॅनी ने दिलेल्या माहिती उघड झाले आहे. मोबाइल आणि डेटा अॅनालिटिक्स फर्म अॅप अॅनीच्या माहितीनुसार, अँड्रॉइड युजर्सने 2018 मध्ये एकूण 900 मिलियन (9 कोटी) तास टिकटॉकवर घालवले आहे. टिकटॉकने सध्या प्रतिस्पर्धी फेसबुकला मागे टाकले आहे. डिसेंबर 2019 मध्ये टिकटॉक चे महिन्याला अॅक्टिव युजर्सची संख्या 81 मिलियन होती. डिसेंबर 2018 च्या तुलनेत ही संख्या 90 टक्के वाढली आहे. टिकटॉकचा वापर चीननंतर भारतात सर्वात जास्त प्रमाणात केला जातो.
2019 मध्ये फेसबुकवर भारतीय लोकांनी 25.5 अब्ज तास घालवले आहेत. याआधी ही केवळ 15 टक्के वाढ होती. तसेच डिसेंबर 2019 मध्ये महिन्याला अॅक्टिव युजर्सची संख्या सुद्धा 15 टक्के वाढ झाली आहे. एकूण वेळापैकी टिकटॉक जरी फेसबुकपेक्षा पाठीमागे असले तरी एक वर्षाआधीच्या तुलनेत यात प्रचंड वाढ झाली आहे. भारतीय युजर्स टिकटॉकवर 2018 च्या तुलनेत 6 पट अधिक वाढले आहे. टिकटॉकवर भारतीय लोक जास्त वेळ करत असल्याचे दिसून आले आहे. 2019 मध्ये भारतीयांनी 5.5 अब्ज तास टिकटॉकवर खर्च केले आहेत. टिकटॉक अॅप सप्टेंबर 2017 मध्ये लाँच झाले होते. स्टार्टअप कंपनी बायट डान्स ही टिकटॉकची पॅरंट कंपनी आहे.