बहुजननामा ऑनलाईन टीम – भारतीय वंशाची भाषा मुखर्जी मिस इंग्लंड २०१९ मधील विजेता ठरली. भाषा मॉडेलिंग सोबतच वृद्धांसाठीही काम करते. वृद्धांसाठी भाषा स्वतः एक संस्था चालवते. भाषा मुखर्जीचे वय २३ असून त्या एक उत्तम डॉक्टर आहेत. नॉटिंघम यूनिवर्सिटी मधून मुखर्जीने मेडिकल मधील २ वेगवेगळे पदवी प्राप्त केले आहे. एक पदवी मेडिकल सायन्सची आहे तर दुसरी मेडिसियन अँड सर्जरीची आहे.
भाषा मुखर्जीचा IQ लेव्हल १४६ आहे. त्या ‘वह ब्यूटी विद ब्रेन’ या वाक्याला शोभेल अशा आहेत. त्या वेगवेगळ्या पाच भाषा वाचू आणि लिहू शकतात. भाषा मुखर्जीचा मॉडेलिंग मध्ये करियर त्या मेडिकल मधील शिक्षण घेत असताना सुरु झाला. मॉडलिंगसाठी भाषा मुखर्जी यांना खूप कष्ट घ्यावे लागले. मेडिकलचा अभ्यास आणि मॉडलिंग यामध्ये चांगला ताळमेळ बसवावा लागला. हे माझ्यासाठी फार अवघड होता. पण मी माझे प्रयत्न शेवट्पर्यंत टिकून ठेवले.
भाषाने २०१३ पासूनच ‘जनरेशन ब्रिज प्रोजेक्ट’ नावाच्या संस्थेतर्फे सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये वृद्धांसाठी अनेक चांगले काम ती करत असे. मिस इंग्लंड प्रतियोगिता मधील संचालक एंजी बेस्ले म्हणाले, ” भाषा एक कष्टाळू मुलगी आहे. आपल्या कष्टावरच तिने एवढ्या कमी वयात हे सगळं काही साध्य केले आहे.