मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वर्दळीच्या ठिकाणी अचानक एक विमान रस्त्यावर आले. चारही बाजूला वाहने असताना पायलटने जागा पाहून विमान लँड केले. हा आश्चर्य करणारा प्रकार वॉशिंगटनच्या काऊंटीमध्ये घडला. या आश्यर्यकारक प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
विमान उतरले रस्त्यावर –
त्याच वेळी रस्ताने जाणाऱ्या एक पोलीस अधिकाऱ्यांने त्याच्या कारमध्ये लावलेल्या कॅमेरात ही घटना रेकॉर्ड केली. सांगण्यात येत आहे की विमानातील इंधन प्रणालीत बिघाड झाल्याने हा प्रकार घडला. यामुळे विमानाचे आपतकालीन परिस्थितीत लॅडिंग करण्यात आले.
रहदारी असलेल्या रस्तावर विमान उतरवून देखील कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही. मिळालेल्या माहिती नुसार हे एक सिंगल प्रोपेलर KR२ विमान होते. सोशल मिडियावर या विमानाची आपत्कालीन लँडिंग पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. यावर लोकांनी अनेक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
While on patrol in east Pierce county, Trooper Thompson just happened to be in the right place at the right time and witnessed the plane make an emergency landing. WSP had no prior knowledge of the pilot’s complications. After 21 years with the patrol, this is a first for him. pic.twitter.com/rUwXsLT8ZJ
— Trooper Robert Reyer (@wspd1pio) August 1, 2019
एका सुरक्षा अधिकाऱ्यांने सांगितले की, सकाळी ८ वाजून १५ मिनिटांच्या दरम्यान ही आपतकालीन लॅडिंग करण्यात आली.
भररस्त्यात विमान उतरवल्यानंतर पायलटने स्वत: उतरुन विमान रस्त्यातून बाजूला घेतले. या पायलटला पोलीस अधिकाऱ्यांनी देखील मदत केली.