नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नौदलाने नेव्हीगेटर (AA आणि SSR ) पदासाठी अर्ज मागविले आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्याची प्रक्रिया शेवटच्या तारखेपूर्वी पूर्ण करावी.
पदाचे नाव : नेव्हीगेटर (AA आणि SSR )
पदाची संख्या : २७००
महत्वाच्या तारखा :
अर्ज सादर करण्यासाठी प्रारंभ तारीख : ८ नोव्हेंबर २०१९
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : १८ नोव्हेंबर २०१९
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास असणे आवश्यक आहे.
वयो मर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा भारतीय नौदलाच्या नियमानुसार निश्चित केलेली आहे.
अर्ज प्रक्रिया:
सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार ८ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि सूचना वाचून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करावे.