बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्त संस्था: भारतीय इंजिनियरींगच्या(Indian Army ) कोणत्याही शोखेतून पदवी मिळवणाऱ्यांसाठी (BE/B Tech) भारतीय सैन्यात(Indian Army ) सेवा देण्याची संधी चालून आली आहे. इंजिनियर पदवीधारकांसाठी शॉर्ट सर्व्हीस कमिशन टेक्निकल कोर्स अंतर्गत जागा निघाल्या आहेत. यात पुरुष आणि महिला या दोन्हीसाठी भरती होणार आहे.
पदांचं नाव
शॉर्ट सर्व्हीस कमिशन (टेक्निकल) 56 पुरुषांसाठी
शॉर्ट सर्व्हीस कमिशन (टेक्निकल) 27 महिलांसाठी
लवकरच घोषित केली जाईल पदांची संख्या
पगार – 56000 रुपये ते 177500 रुपये एवढे पेस्केल देण्यात येणार आहे.
(लेव्हल 10 नुसार) या भरतीसाठी उमेदवारांना जॉईन इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर म्हणजेच joinindianarmy.nic.in
अर्जाची अंतिम तारीख – 12 नोव्हेंबर 2020.
उमेदवाराला कोणतंही अर्ज शुल्क आकारलं जाणार नाही. ही प्रक्रिया निशुल्क आहे.
दरम्यान 13 ऑक्टोबरला कायद्याची पदवी एलएलबी कमीत कमी 55 टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्यांसाठी जागा काढण्यात आल्या आहेत. यात 5 पुरुष आणि 3 महिलांसाठी ही भरती आहे. वयाची अट 21 ते 27 आहे. 14 वर्षे सेवा करावी लागणार आहे. यासाठी पेस्केल 56100 ते 218200 एवढे पदांनुसार दिले जाणार आहे.