बहुजननामा ऑनलाईन – पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग(PSU)च्या अंतर्गत इंडिया पोस्ट ऑफिसने ‘स्टाफ कार ड्रायव्हर’ पदासाठी १० जागा काढल्या आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे हलके आणि अवजड मोटार वाहन चालविण्याचा परवाना असावा. या पदांसाठी ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवार १३ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी इंडिया पोस्ट ऑफिसच्या www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
निवड झालेल्या उमेद्वाराला ७ व्या आयोगाच्या लेवल – २ मैट्रिक्स प्रमाणे १९,९०० एवढा पगार मिळणार आहे. इंडिया पोस्ट ऑफिस ने ‘स्टाफ कार ड्रायव्हर’ पदांसाठी १० जागा काढल्या आहेत. ज्यामध्ये ५ जागा जनरल कॅटेगरीसाठी, २ जागा ओबीसीसाठी (OBC), १ जागा एससीसाठी (SC ), १ जागा एसटीसाठी (ST), १ जागा ईडब्ल्यूएससाठी (EWS) आणि १ जागा ईएसएमसाठी (ESM) आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे वयोगटातील असावेत. आणि उमेदवार किमान दहावी पास असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराकडे हलके आणि अवजड मोटार वाहन चालविण्याचा परवाना असावा.
Visit : bahujannama.com