नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ind vs Eng | लॉर्ड्सच्या बाल्कनी (Lord’s Balcony) चे एक छायाचित्र प्रत्येक भारतीयाच्या हृदयात बंद आहे, आणि ते आहे सौरव गांगुली (Sourav Ganguly) चे जर्सी काढून इंग्लंडच्या (Ind vs Eng) भूमीवर विजयाचा जल्लोष साजरा करतानाचे. आता त्याच बाल्कनीतील विराट कोहलीचे एक छायाचित्र प्रचंड वायरल होत आहे.
2002 मध्ये गांगुलीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडला त्यांच्या भूमीत नेटवेस्ट ट्रॉफीच्या फायनलमध्ये मात दिली होती. ज्यानंतर गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत जर्सी काढून जल्लोष साजरा केला होता.
लॉर्ड्सच्या त्याच बाल्कनीत आता विराट कोहलीने नागिन डान्स (Virat Kohli’s Snake Dance) केला. ज्याची छायाचित्र सोशल मीडियावर वायरल होत आहेत.
छायाचित्रात मयंक अग्रवाल, के.एल. राहुल आणि मोहम्मद सिराज त्याच्या डान्सचा (Virat Kohli’s Nagin Dance) आनंद घेताना दिसत आहेत.
कोहलीच्या डान्सवर आता सोशल मीडियावर मजेशीर मीम्स तयार होत आहेत.
इंग्लंडविरूद्ध दुसर्या टेस्टच्या पहिल्या डावात कोहलीने 42 धावांची खेळी केली होती.
त्याने तिसर्या विकेटसाठी राहुलसोबत 117 धावांची भागीदारी केली होती.
Web Title :-
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update