मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अनेक शहरांमध्ये खासगी क्लासेसचं जाळं पसरलं आहे. यातून कोट्यवधींची उलाढाल होत असते. आयकर विभागानं नुकत्याच खासगी क्लासेसवर धाडी टाकल्या आहेत. यात मोठं घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. काही क्लासेसवर आयकर विभागाच्या पथकांनी धाड टाकल्यानंतर अधिकाऱ्यांनी काही खासगी क्लासेसची झडती घेतली आहे. मराठवाड्यातील अनेक शहरांचा यात समावेश आहे.
लातूर आणि नांदेड शहरात एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या धाडीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पोलिसांचा फौजफाटाही होता. शहरातील खासगी क्लासेसमध्ये राज्यातील तसेच परराज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात फी घेतली जाते. या क्लासेसनं समांतर शिक्षण संस्थाच उभारली आहे. त्यामुळेच आयकर विभागाने या क्लासेसवर धाडी टाकल्या आहेत. यावेळी अनेक क्लासेसने आपल्या नियमित वर्गांना सुट्टीही दिली आहे.
औरंगाबादमधील आयकर खात्याचं पथक नांदेड आणि लातूरमध्ये पोचलं आहे. शहरातील मोटेगावकर कोचिंग क्लासेस, क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेस, आयआयबी आणि मुंडे कोचिंग क्लासेस इत्यादी क्लासेसची आयकर विभागाने झडती घेतली आहे. या धाडींमध्ये मोठं घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. दरम्यान धाडींबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Visit : Bahujannama.com