नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमच्याकडे वाहनाची सर्व कागदपत्रे असली तरी अनेकदा असे होते की, तुमच्याकडून काहीतरी चूक होते, जी तुम्हाला कळतही नाही आणि तुम्हाला दंडा भरावा लागू शकतो. कारण असेही काही दंड आहेत जे कदाचित तुम्हाला माहितीही नसतील.
झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभं करू नका
अनकेदा सिग्नलला थांबल्यानंतर काहीजण झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवतात. ही झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांसाठी असते. त्यामुळे यावर जर तुम्ही वाहन थांबवलं तर असं करणं वाहतूक नियमाचं उल्लंघन ठरू शकतं.
किती आहे दंड ?
जर तुम्ही झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी केली तर नवीन वाहतूक नियमानुसार, कमीत कमी 100 रुपयांचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो. जर तुम्ही जास्त पुढे गाडी उभी केली असेल तर तुम्ही खतरनाक ड्राईव्हींग करता अंस समजलं जाऊ शकतं.
हे आहेत असे काही दंड जे तुम्हाला माहीत नसतील
जर तुम्ही योग्य ठिकाणी हॉर्नचा वापर करत नसाल किंवा तुमच्या गाडीला हॉर्न नसेल तर 100 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. जर तु्म्ही जास्त हॉर्न वाजवला किंवा अनावश्यक हॉर्न वाजवला तरीही दंडापासून वाचू शकत नाहीत. याप्रकरणीही तुम्हाला 100 रुपये दंड भरावा लागू शकतो. इतकेच नाही तर, तुम्ही फूटपाथवर गाडी चालवली तर तुम्हाला 100 रुपये दंड भरावा लागू शकतो.
ओव्हरटेकींगलाही दंड
जर तु्म्ही रस्त्यात खतरनाक पद्धतीने ओव्हरटेक करत असाल किंवा लेफ्ट साईडने ओव्हरटेक करत असाल तर वाहतूक नियम तोडत आहात. तुम्हाला 100 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
कारमध्ये म्युझिक किंवा रेडिओ ऐकणं पडू शकतं महागात
जर तुम्ही कार किंवा वाहन चालवत असाल आणि याचवेळी म्युझिक ऐकत असाल तेही मोठ्या आवाजात तर तुम्ही वाहतूक नियम मोडत आहात. यासाठी तुम्हाला 100 रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
वायपर गरजेचे
जर तुमच्या गाडीला वायपर नसतील तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. हा दंड शंभर रुपये असू शकतो. जर तुमच्या गाडीला साईड मीरर नसेल तरीही तुम्हाला 100 रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
गाडीचे टायर चांगले नसतील तर…..
जर तुमच्या गाडीचे टायर चांगल्या स्थितीत नसतील तर तुम्हाला दंड लागू शकतो. हा दंड कमीत कमी 100 रुपये असू शकतो. टायर खराब असल्याने वाहनाचा अपघात होऊ शकतो.
Visit : bahujannama.com