कोल्हापूर बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसला राजकिय धक्के बसण्याची मालिकाच सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आता इतर पक्षात प्रवेश करण्याची चर्चा असतानाच पक्षातील कोल्हापूर जिल्हातील आमदार व कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घर आणि साखर कारखायन्यावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आज पहाटे मुश्रीफ यांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल झाले. यामुळे एकच खळबळ मात्र उडाली आहे.
हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार आहेत. दरम्यान ते जिल्हा बँकेचे अध्यक्षही आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेत कर्जमाफी गैरव्यवहार झाला होता. तेव्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. दरम्यान आज हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरासह कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकला. तर त्यांच्या मुलासह साडूंच्या घरावरही छापा टाकण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र आपण पक्षाशी गद्दारी करणार नसल्याचे मुश्रीफ म्हणाले होते. मुश्रीफ हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू समजले जातात. तर ते पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुस्लीम चेहरा म्हणून ओळखले जातात.