मुखेड : बहुजननामा ऑनलाइन – दलितवस्तीचा निधी रोखणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करू असा इशारा मुखेडचे माजी नगरसेवक राहुल लोहबंदे यांनी दिला आहे. नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या दलितवस्तीच्या विकासकामांची यादी जाहीर होताच काही जातीयवादी मानसिकतेच्या मंडळींच्या तक्रारीवरून सदरील विकासकामांना स्थगिती आदेश डेन्ह्यात आले होते. यादरम्यान हा इशारा करण्यात देण्यात आला आहे.
शासनातर्फे दलितवस्तीच्या विकासकामांसाठी दरवर्षी कोट्यवधीचा निधी देत असतो. याचदरम्यान नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या दलितवस्तीच्या ३९ कोटी ७४ लक्ष रुपयांच्या १६५५ विकासकामांची यादी जाहीर केली आहे. या निधीच्या माध्यमातून दलित वस्ती अंतर्गत सी.सी.रस्ता, नाली बांधकाम, पाणीपुरवठा योजना, सांस्कृतिक सभागृह, विद्युतीकरण आदी विकासकामे केली जातात. यावर्षी नांदेड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने सर्व जिल्हा परिषद सदस्यांकडून वंचित दलित वस्त्यांचा आराखडा मागविला होता. ग्रामपंचायतीच्या मागणी व शासकीय निकषानुसार ३९ कोटी ७४ लक्ष रुपयांच्या १६५५ कामास मंजुरी देण्यात आली होती. मात्र काही लोकांतर्फे या विकासकामांना स्थगिती मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. दरम्यान त्यांच्या तक्रारीवरून सदरील विकासकामांना स्थगिती आदेश मिळाले आहेत. यावेळी दलितवस्तीचा निधी रोखणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करू असा इशारा मुखेडचे माजी नगरसेवक राहुल लोहबंदे यांनी दिला.
इतकेच नव्हे तर, हा प्रकार अत्यंत निंदनीय असून दलित वस्ती कामाच्या निधीला वारंवार स्थगिती आदेश का काढण्यात येतो? याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर स्वत:च्या स्वार्थासाठी दलित समाजाच्या वस्तीच्या विकासकामात ढवळाढवळ करणाऱ्या मंडळीवर कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. याचबरोबर दलित, वंचित समाजाच्या या संदर्भात भावना तीव्र आहेत. यापुढे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.