राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानिक चौकटीत आणण्यासाठी काँग्रेस आराखडा देत नाही. त्यामुळे काँग्रेस सोबत आघाडीबाबत चर्चा थांबली आहे. काँग्रेस आमच्या सोबत आघाडी करण्यासाठी उत्सुक आहे. असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानिक चौकटीत आणण्यासाठी काँग्रेस आराखडा देतील असे वाटत नाही. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर, आम्ही ४८ उमेदवार उभे करु शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इतकेच नव्हे तर, मी लोकसभा निवडणूक लढणार हे नक्की आहे. मात्र लक्ष्मण माने यांनी सहीच करणार नाही, असे म्हटल्यामुळे मला आधी तो तिढा सोडवायचा आहे. लक्ष्मण माने यांनी सुशीलकुमार शिंदेंचे ब्लड प्रेशर वाढवायचे ठरवले आहे, असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर आता मला नागपूरबाबत विचारत आहात, गडकरींचे ब्लड प्रेशर वाढवायचे कोणी ठरवले माहिती नाही, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी टोला लगावला.
विशेष म्हणजे, काँग्रेसचा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला आघाडीत चार जागांचा प्रस्ताव आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.