बहुजननामा ऑनलाईन – आयआयटी मध्ये गेल्या दोन वर्षांपासून २४६१ विद्यार्थांनी मधूनच शिक्षण सोडले आहे. यामध्ये १२९० विद्यार्थी हे सामान्य वर्गातले तर ११७१ विद्यार्थी हे आरक्षित वर्गातले होते. आयआयटी मध्ये मधूनच शिक्षण सोडणारे विद्यार्थी हे बीटेक मधील नसून एमटेक आणि पीएचडी मधील आहेत. कारण हे विद्यार्थी नोकरी मिळाल्यानंतर शिक्षण मधूनच सोडून देतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयआयएम मध्येही १६१ विद्यार्थांनी मधूनच शिक्षण सोडले आहेत.
मानव संसाधन विकास मंत्रालयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते देशातील एकूण ३१ आयआयटी मधील मागील दोन वर्षांपासून २४६१ विद्यार्थांनी आपले शिक्षण मधूनच सोडले आहे. यामध्ये आयआयटी मधील ३७१ विद्यार्थी एसी, १९९ एसटी आणि ६०१ विद्यार्थी हे ओबीसी वर्गातील आहेत . याशिवाय आयआयएम मधील ९९ विद्यार्थी हे सामान्य वर्गातले, १४ विद्यार्थी एसी, २१ एसटी आणि २७ ओबीसी वर्गातील आहेत .
मधूनच शिक्षण सोडण्याची कारणे
आयआयटी मध्ये मधूनच शिक्षण सोडणाऱ्यांची संख्या ही एमटेक आणि पीएचडी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर अधिक विद्यार्थी जागा सोडून देतात. कारण प्रवेश झाल्यानंतर त्यांना पब्लिक सेक्टर युनिट (पीएसयू) मध्ये नोकरी मिळते आणि त्यानंतर हे विद्यार्थी मधूनच शिक्षण सोडून देतात. या व्यतिरिक्त कौटुंबिक कारणे, तणाव, अभ्यासक्रम समजण्यात अडथळा या अशा अनेक कारणामुळे प्रवेशानंतर विद्यार्थी मधूनच शिक्षण सोडून देतात.
आयआयटी मधून शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थांची संख्या
दिल्ली ७८२ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ३५६ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, खडगपूर ६२२ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ३२३ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, कानपुर १९० सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ८४ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, मुंबई २३६ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ११५ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, मद्रास १२८ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ५८ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, गुवाहाटी १२ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि १० आरक्षित वर्गातले विद्यार्थी, बीएचयू ०७ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ०० आरक्षित वर्गातले विद्यार्थी, हैद्राबाद ८५ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ३७ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, पटना ९२ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ३५ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, भुवनेश्ववर ३९ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि १९ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, इंदौर ५० सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि १७ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, मंडी ३४ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ०९ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, रोपड ३४ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि २० आरक्षित वर्गातले विद्यार्थी, तिरुपती १८ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि १२ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, जोधपूर २१ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि १० , जम्मू ०६ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ०० आरक्षित वर्गातले विद्यार्थी.
आयआयएम मधून शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थांची संख्या
इंदौर १७ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ०९ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, काशीपूर १३ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ११ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, तिरूचपल्ली १२ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ०७ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, कोचिकोड १२ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ०७ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, बेंगळूर ०२ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ०२ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, अहमदाबाद ०३ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ०२ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, जम्मू ०८ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ०५ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, बोधगया ०४ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ०१ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, विषापट्टणम ०४ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ०२ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, लखनऊ ०९ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ०७ आरक्षित वर्गातले विद्यार्थी, अमृतसर ०२ सामान्य वर्गातले विद्यार्थी आणि ०१ आरक्षित वर्गातले विद्यार्थी.