• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

वृत्तपत्र विकून शिक्षण घेतले – बनला IFS ऑफिसर, तुमचा दृष्टीकोन बदलेल ‘या’ अधिकार्‍याची कथा

by ajayubhe
November 30, 2020
in विशेष बातम्या
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरात आठ भाऊ-बहिण, वडिलांना दारूचे व्यसन, घर चालवण्यासाठी वृत्तपत्र विकावे लागणे, अशा परिस्थितीत आयएफएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणे शक्य आहे का ? परंतु, पी बालमुरुगन यांच्यासारखे लोक हे करून दाखवतात. आयएफएस अधिकारी पी बालमुरुगन यांच्याबाबत तुम्ही जाणून घेतले तर तुमचा सुद्धा विचार करण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल.

चेन्नईच्या किलकट्टलाईमध्ये जन्मलेले बालमुरुगन यांनी त्याकाळी आपल्या शिक्षणासाठी वृत्तपत्रे विकली होती. नंतर एका प्रसिद्ध कंपनीतील नोकरी सोडून यूपीएससीद्वारे भारतीय वन सेवेत (आयएफएस) दाखल झाले. सध्या ते राजस्थानच्या डूंगरपुर वन विभागात परिविक्षाधीन अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत आहेत.

बालमुरुगन सांगतात 1994 च्या सुमारास त्यांचे वडिल घर सोडून गेले होते. घरात माझ्याशिवाय सात भाऊ-बहिण होते, ज्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी माझी आई पलानीमलवर आली होती. केवळ 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या आईकडे कोणताही पर्याय नव्हता. तेव्हा तिची इच्छा होती की, आम्ही किमान आमच्या पायावर उभे राहावे.

बालमुरुगन सांगतात की, एक तो काळ होता जेव्हा मी न्यूजपेपर वेंडरकडे तामिळ पेपर वाचायला मागितला, तेव्हा त्याने मला मंथली 90 रुपये भरून सदस्यत्व घेण्यास सांगितले, मी त्याला सांगितले माझ्याकडे पैसे नाहीत, तेव्हा त्याने मला 300 रुपयांचा जॉब ऑफर केला, जी माझ्यासाठी कदाचित चांगली ऑफर होती.

अशा कठिण स्थितीत त्यांच्या मामाने सुद्धा कुटुंबाची मदत केली. त्यांच्या आईने तिचे दागिने विकून चेन्नईमध्ये एक छोटी जागा घेतली. जिथे गवताच्या छताखाली संपूर्ण कुटुंब राहू लागले. हा त्यांच्या संघर्षाचा तो काळ होता जेव्हा बालमुरुगन परिस्थितीतून शिकून पुढे जाण्याचा विचार करत होते. या संपूर्ण प्रवासात त्यांची आई त्यांची खरी ताकद बनली, जिने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्या खरेदी केलेल्या जमिनीचाही काही भाग विकला.

बालमुरुगन सांगतात की, त्यांनी नऊ वर्षाच्या वयात वृत्तपत्र विकून आपल्या फीसाठी पैसे जमवण्यास सुरूवात केली होती. त्याच काळात शिक्षणाची गोडी लागली. ही गोडीच युपीएससीच्या तयारीसाठी उपयोगी पडली. त्यांनी मद्रास इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेन्नईतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्यूनिकेशन ब्रँचमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

ग्रॅज्युएशननंतर त्यांनी टीसीएस जॉईन केले. त्यांचे पॅकेज लाखो रूपयांत होते. परंतु, एक असा प्रसंग घडला जेव्हा एका आयएएस ऑफिसर आणि प्रशासकीय कामांनी त्यांना खुप प्रभावित केले आणि त्यांनी सिव्हिल सर्व्हिसची एग्झाम देण्याचे स्वप्न पाहिले.

माझ्यासाठी हे खुप कठिण होते की, नोकरी सोडून पुन्हा जमीनीवर यायचे आणि अभ्यास सुरू करायचा. अखेर विचार करून मी नोकरी सोडली, यासाठी कुटुंबाने साथ दिली. मी यूपीएससीच्या तयारीसाठी लाखो रूपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून चेन्नईत शंकर आयएएस अकॅडमीत अ‍ॅडमिशन घेतले आणि तयारी सुरू केली. मात्र, तोपर्यंत माझ्या घरातील परिस्थिती खुप सुधारली होती. कारण, मोठी बहिण कमावती झाली होती.

बालमुरुगन म्हणतात की, जीवन मुल्यांकडून मी हेच शिकलो की जर काही मिळवण्याची इच्छा आहे तर ते पूर्ण मनापासून करा. एकवेळ उपाशी झोपा, पण अभ्यास केल्याशिवाय कधीही झोपू नका. नेहमी मोठे लक्ष्य असेल तरी खूप बलिदान द्यावे लागते, त्यासाठी तयारी ठेवा. अनेकदा आपल्या सुख सुविधांसह आपल्या कम्फर्ट झोनचा सुद्धा त्याग करावा लागतो.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namacurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsNew Delhip balamuruganनवी दिल्लीपी बालमुरुगनबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभीमनामा
Previous Post

Pune : बोपदेव घाटात 3 दुचाकीवरून आलेल्यांनी तरूणाला लुटलं

Next Post

पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर रजनीकांत यांचं मोठं वक्तव्य

Next Post

पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर रजनीकांत यांचं मोठं वक्तव्य

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Pune News : भारतभर होणार सर्वात मोठे विनामूल्य मूळव्याध तपासणी शिबिर

6 days ago

फक्त 2 ‘इंचा’साठी कायपण, 28 वर्षीय तरूणानं ‘उंची’ वाढवण्यासाठी केला एवढा खर्च, तुम्ही वाचून व्हाल थक्क

7 days ago

घरगुती गॅस सिलेंडरच्या अनुदानाला कात्री, जाणून घ्या

23 hours ago

Pune News : वृत्तपत्रांची विश्वासार्हता आजही टिकून – माजी उपमहापौर निलेश मगर

17 hours ago

Gold Rates : सलग चौथ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ कायम

7 days ago

देशभक्ती अन् राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे पितळ उघडे पडलेय, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat