बहुजननामा ऑनलाइन टीम – त्वचेवर चामखीळ( warts) येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पेपिलोमा विषाणू होय. चेहरा, मान, हात, पाठ, पाय यावर चामखीळ येतात. चामखीळपासून मुक्ती हवी म्हणून लोक बर्याच महागड्या उपचारांचा अवलंब करतात, तरी पूर्णपणे या समस्येपासून मुक्ती मिळत नाही. चामखीळमुळे वेदना होत नाहीत. मात्र तरी शरीराच्या दिसणाऱ्या भागावर चामखीळ असेल तर कसेतरी वाटते.
चामखीळ पूर्णपणे काढण्यासाठी घरगुती उपचार (-home-remedies)
अॅपल सिडेर व्हिनेगर- myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते, अॅपल सिडेर व्हिनेगर हे त्वचेसाठी अतिशय प्रभावी औषध आहे. यात अनेक प्रकारचे दाहक आणि संसर्गविरोधी गुणधर्म आहेत. जे त्वचेचे डाग काढून टाकतात. व्हिनेगर वापरताना त्यात थोडसे पाणी मिसळा आणि चामखीळच्या जागी थोडावेळ बोटाने हळूहळू मालिश करा. कोरडे झाल्यानंतर धुवा. दिवसातून दोनदा हा उपाय करा.
केळीची साल- केळीची साल चामखीळ पासून मुक्त होण्यासाठी एक उत्तम औषध आहे. साल चामखीळ सुकवण्यास उपयुक्त असून बाधित भागावर ठेवा आणि या जागेला कापडानं बांधा. हे नियमितपणे अवलंबल्यास काही दिवसांत चामखीळ कोरडी होऊन निखळून पडेल.
बेकिंग सोडा- चामखीळ काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर खूप प्रभावी आहे. यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये एरंडेल तेलाचे काही थेंब मिसळावे आणि हे मिश्रण चामखीळवर लावून हलक्या हातांनी मालिश करा. एका तासानंतर तो भाग स्वच्छ पाण्याने धुवा. एक महिना नियमितपणे हा उपाय केल्यास फरक जाणवेल.
लसूण- myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, लसणात अँटीफंगल आणि जीवाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत. जो त्वचेवरचे चामखीळ काढण्यात मदत करतो. दोन लसूण पाकळ्यांची पेस्ट करून ती चामखीळवर लावा. तासाभराने तो भाग स्वच्छ पाण्यानं धुवा. आपण दिवसातून दोनदा हा उपाय करू शकता.
कांद्याचा रस- कांद्याच्या रसाने देखील चामखीळ काढता येते. एका कांद्याचा रस काढा. आता या रसाने चामखीळच्या जागी काही वेळ मालिश करा. महिनाभर दिवसातून एकदा या पद्धतीचं अनुसरण करा. चामखीळची समस्या काही दिवसातच दूर होईल.
या गोष्टींची घ्या खबरदारी- जर आपल्याला चामखीळ काढायचे असतील तर आपण ते कापू देखील शकता. पण याबद्दल देखील आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. चामखीळ कापल्यानंतर परत येते आणि त्याचा आकार देखील मोठा होतो. आपण पुन्हा पुन्हा कापल्यास ते परत येऊन त्याचा आकार वाढू शकतो आणि हे पूर्वीपेक्षा आणखी विचित्र दिसेल.