बहुजननामा ऑनलाइन टीम – ‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील दिग्ग्ज अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal)यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, ही चूक सर्वांपुढं आणत त्या हात जोडून माफी मागताना दिसत आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडवर चांगल्याच भडकलेल्या दिसल्या. अलका कुबल यांनी तिच्यावर काही आरोपही केले ज्याविषयी एका मुलाखतीत बोलताना त्यांच्या तोंडून छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला. त्यानतंर त्यांनी जाहीर माफी मागितल्याचं पाहायला मिळालं.
मालिकेसंदर्भातील वाद आणि त्याबाबतच्या चर्चा सुरू असतानाच त्याबाबत बोलताना आपण छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, ही चूक सर्वांपुढं आणत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत नितांत आदर असल्याचं त्या म्हणाल्या. शिवाय अनावधानानं आपल्याकडून त्यांचा एकेरी उल्लेख झाला त्याबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली.