पुणे : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभेसाठी अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. राजकीय क्षेत्रात नवखे असल्याने आणि त्यांच्या बोलण्यावरून ते सारखे सोशल मीडियावरून वारंवार ट्रोल होत आहेत. यावरून युजर्सच्या या ट्रोलिंगवर अजित पवार चांगलेच भडकले आहेत. पार्थ चुकला तर त्याला फाशी द्याल का? असा संतप्त सवाल त्यांनी जनतेला विचारला आहे.
युजर्सच्या ट्रोलिंगवर संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करत अजित पवार म्हणाले, की पार्थ हा राजकीय क्षेत्रात नवीन असून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. ख्रिस्ती धर्मगुरुंकडे जाण्याचे कृत्य चुकीचेच होते. त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली. मात्र, मी त्याला समजावून सांगितले आहे. त्याने केलेल्या चुकीला फासावर लटकवता का? असा सवाल अजित पवारांनी केला. ‘सोबतची मंडळी आग्रह धरतात आणि मग जावे लागते. ही गोष्ट अजित पवारांनी केली असती, तर ती चूक ठरली असती. पण पार्थकडून ते नकळत झाले आहे. अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे.