पुणे बहुजननामा ऑनलाईन – मला कोणी डिवचलं तर, त्याला संपावयची ताकद माझ्यात आहे असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिला तसेच ‘पक्षातील कितीही लोक सोडून गेले तरी, रासप हा पक्ष वाढत जाणार आणि एक दिवस लाल किल्ल्यावर रासपचा झेंडा फडकविणार असल्याचेही ते बोलले”
पुढे बोलताना ते म्हणाले काही वर्षापुर्वी रासपचे २ जिल्हापरिषद सदस्य होते, आज राज्यभरात ९८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. पक्ष सतत वाढत जाणार आहे. त्यासाठी पक्षाचे संघटन वाढवले पाहिजे तसेच आघाडीमध्ये रासपला सहा जागा देत होते. पण, बुडत्या नावेत बसणार नाही तसेच भाजपकडून माढा आणि बारामतीची ऑफर होती .पण भाजपाच्या चिन्हामुळे आह्मी त्या जागा स्वीकारल्या नसल्याचेही ते बोलले .