अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – मेळघाटमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आढळतात धूलिवंदनानंतर मेळघाटातील आदिवासींमध्ये धूम सुरू झाली आहे फगव्याची. या पारंपरिक उत्सवात पुढील पाच दिवस मेळघाटातील मुख्य रस्त्यांवर गैरआदिवासी (जांगडी) यांना अडवून फगवा अर्थात पैशांसाठी गीत-संगीताच्या तालावर मनधरणी केली जाणार आहे. आदिवासी पुरुष व महिलादेखील फगव्यासाठी रस्ता, वाहने अडवित असून, आदिवासी पारंपरिक गीत-संगीताचे माधुर्य या काळात सगळीकडे पसरले असून आदिवासींमध्ये एक उत्सवाचे वातावरण आहे .