नवी दिल्ली : वृत्तसांस्था – अमेरिकेची मोठी कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स (आयबीएम) मध्ये मुळ भारतीय वंशाचे अरविंद कृष्णा नवे सीईओ होणार आहेत. ते आयबीएमचे सीईओ म्हणून वर्जीनिया रोमेटी यांची जागा घेतील. 12,588 करोड डॉलर (सुमारे 8.93 लाख करोड रुपये) ची मार्केट कॅपवाली कंपनी आयबीएमने 57 वर्षांच्या अरविंद कृष्णा यांना 6 एप्रिलपासून सीईओची जबाबदारी देण्याची घोषणा केली आहे. अरविंद कृष्णा, सध्या क्लाऊड आणि कॉग्निटिव्ह सॉफ्टवेयरसाठी आयबीएममध्ये सीनियर व्हाईस प्रेसिडेंट पदावर काम करत आहेत. त्यांच्या सध्याच्या जबाबदारीमध्ये आयबीएम क्लाउड, आयबीएम सिक्योरिटी आणि कॉग्निटिव एप्लिकेशन बिझनेस आणि आयबीएम रिसर्च सुद्धा आहे. अरविंद आयबीएम सिस्टम आणि टेक्नोलॉजी ग्रुपचा डेव्हलपमन्ट आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायजेशनचे जनरल मॅनेजर सुद्धा होते. त्यांनी आयबीएमच्या डेटाशी संबंधित अनेक बिझनेसची सुरूवात केली आहे. त्यांनी 1990मध्ये आयबीएम जॉईन केले होते.
अरविंद कृष्णा यांच्या नियुक्तीबाबत वर्जीनिया रोमेटी यांनी म्हटले की आयबीएमच्या पुढील वाटचालीसाठी अरविंद हे बेस्ट सीईओ आहेत. ते खुप चांगले टेक्नॉलॉजिस्ट आहेत, ज्यांनी आर्टिफिशियल इन्टेलिजन्स, क्लाउड, क्वांटम कम्प्यूटिंग आणि ब्लॉकचेन सारखी आमची महत्वाची तंत्रज्ञान विकसित केली आहेत.
अरविंद कृष्णा यांनी आयआयटी कानपुरमधून अंडरग्रॅज्युएटची डिग्री घेतली आहे. त्यांनी यूनिव्हर्सिटी ऑफ इलनॉइज, अर्बाना शँपेनमधून पीएचडी केली आहे. ते एक चांगले ऑपरेशनल लीडर सुद्धा आहेत.
बिग ब्लू या नावाने जगात प्रसिद्ध आयटी कंपनीने 20 शताब्दीत आपल्या टेक्नोलॉजीच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. आयबीएमची स्थापना 16 जून 1911ला करण्यात आली होती.
कम्प्यूटर कंपन्यांमध्ये आयबीएम एकमेव अशी कंपनी आहे, ज्या कंपनी आतापर्यंत तीन नोबेल पुरस्कार, चार टूरिंग पुरस्कार, पाच राष्ट्रीय तंत्रज्ञान पदक तसेच पाच राष्ट्रीय विज्ञान पदक जिंकले आहेत. कंपनीच्या नावावर जगातील सर्वाधिक पेटंट असल्याचा गौरवास्पद इतिहास आहे.
16 जून 1911 ला आयबीएम कंपनीने आपले कार्यक्षेत्र बदलून कम्प्यूटर रिसर्च केले तर 1924 मध्ये आपले सध्याचे नाव आयबीएम स्वीकारले. 1981 मध्ये आयबीएमने पर्सनल कम्प्यूटर्सची विक्री सुरू केली. ज्यामुळे आयबीएम लवकरच जगातील एक सर्वोत्तम कंपनी झाली.