IAS Dr. Anil Ramod | डॉ. अनिल रामोड यांनी निकालासाठी प्रलंबीत ठेवली 374 प्रकरणे, CBI करणार चौकशी
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड (IAS Dr. Anil Ramod) यांनी पुणे विभागातील (Pune Revenue Department) पुणे, सातारा (Satara), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur) आणि सोलापूर (Solapur) या पाच जिल्ह्यांमधील 374 प्रकरणे केवळ निकालासाठी प्रलंबित ठेवली असल्याचे समोर आले आहे. रामोड (IAS Dr. Anil Ramod) यांनी प्रलंबित ठेवलेल्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक प्रकरणे (Pending Cases Of Revenue) पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांचे गूढ वाढले असून याचाही तपास सीबीआय Central Bureau of Investigation (CBI) करणार आहे.
डॉ. अनिल रामोड (IAS Dr. Anil Ramod) हे विभागीय आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्त पदावर (Additional Divisional Commissioner) होते. भूसंपादन प्रकरणात न्यायनिवाडा (Land Acquisition Case In Pune Division) करण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra State Government) लवाद म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. सन 2020 पासून पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 374 प्रकरणे रामोड यांनी केवळ निकालासाठी प्रलंबित ठेवली. त्यामुळे या प्रकरणांचे गूढ वाढले आहे.
प्रकरणांचा निकाल देण्यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी का घेण्यात आला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान डॉ. अनिल रामोड यांच्याकडे सातारा जिल्ह्यातील 2020, 2021 आणि 2022 मधील 74 प्रकरणे निकालासाठी प्रलंबित आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात तीन वर्षातील 44, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 58, पुणे जिल्ह्यात 166 प्रकरणे निकालासाठी प्रलंबित आहेत,
अशी माहिती विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे. (Anil Ramod News)
रामोड यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक प्रकरणे पुणे जिल्ह्यातील आहेत. पुणे जिल्ह्यातील 166 प्रकरणे प्रलंबित आहेत.
यामध्ये 2020 मधील 37, 2021 मधील 71 आणि 2022 मधील 58 अशा एकूण 166 प्रकरणांचा समावेश आहे.
Web Title : IAS Dr. Anil Ramod | mystery of 374 pending cases by pune ias dr anil ramod investigation by cbi
- Pune PMC Action On Dangerous Old Wada | पासाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका सतर्क ! शहरातील 30 धोकादायक वाडे जमीनदोस्त; 58 वाड्यांना नोटीसा
- Maharashtra Policemen Death During Swimming | पार्टीनंतर स्विमींगसाठी गेलेल्या पोलिसाचा बुडून मृत्यू
- ACB Trap News | शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ ! 75 हजाराची लाच चेकने घेणार्या मुख्याध्यापकाला अटक; शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, हेडमास्तर अन् लिपीक अॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर
Comments are closed.