नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – राज्याच्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून इछुकांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघासाठी आज मुलाखती पार पडल्या, त्यावेळी एकेकाळी या मतदारसंघातून निवडून आलेले माजी मुख्यमंत्री मुलाखत देणाऱ्यांमध्ये नाही तर मुलाखती घेणाऱ्यांमध्ये होते. त्यावेळी त्यांनी मी निव़डणूकीस इच्छुक नाही असं विधान केलं.
यावर अशोक चव्हाण म्हणाले, मी निवडणूक लढण्यासाठी पक्षाची जी प्रक्रिया असते. ती पुर्ण केली आहे. मात्र आपण स्वत:साठी पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. तसेच पक्षाने जर आदेश दिले तर आपण निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. तर नांदेड मतदारसंघ हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी सांगितल्यानुसार ते आता विधानसभा निवडीणूकीसाठी ते इच्छुक नाहीत.