श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने धडक कारवाई करीत पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा घुसखोरीचा डाव हाणून पाडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे झालेल्या चकमकीदरम्यान ७ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
Jammu & Kashmir: In the last 36 hours, Indian Army has foiled an infiltration attempt by a Pakistani BAT (Border Action Team) squad in Keran Sector. 5-7 Pakistani army regulars/terrorists eliminated, their bodies are lying on the LoC, not retrieved yet due to heavy firing. pic.twitter.com/mYscvr78C1
— ANI (@ANI) August 3, 2019
अमरनाथ यात्रेच्या मार्गादरम्यान २ ऑगस्टला पाकिस्तानी स्रायपर सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले. त्याचवेळी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरनाथ यात्रेदरम्यान घातपात करण्याची पाकिस्तानातील दहशतवाद्यांची योजना असल्याचे समजले. त्यामुळे केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा आटोपती घेण्यास सांगितले असून पयर्टकांना तातडीने काश्मीर सोडून आपापल्या गावी जाण्याच्या सूचना देण्यात आला आहे. केरन सेक्टरमध्ये जोरदार चकमकी सुरु असल्यामुळै लष्कराला दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेता आलेले नाहीत. त्यांची ओळखही पटविता आलेली नाही. त्यामुळे लष्कराने उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानचे सैनिक प्रयत्न करत आहेत.