नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – २०१४ च्या लोकसभा निवडणूक मध्ये भाजपने मी चहावाला’ या अभियानाचा प्रयोग केला होता. आता २०१९ च्या निवडनुका मध्ये भारतीय जनता पक्षाने ‘मैं भी चौकीदार’ अभियान राबवले असता.याअभियानाला भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केराची टोपली दाखवली आहे. मी ब्राह्माण आहे.चौकीदाराने काय करायचे आहे. याचा आदेश मी देईन असे ते म्हणले. त्यांच्या या वक्त्यव्यारुन त्यांच्या डोक्यातील वर्णवादी मानसिकता दिसून येते. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे
राफेल कराराच्या घोटाळ्यानंतर आरोप करीत काँग्रेसने ‘चौकीदार चोर है’ ही मोहीम सुरू केली होती. काँग्रेस ला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने ‘मैं भी चौकीदार’ हे अभियान सुरू केले आहे. त्यानंतर देशभरात भाजपा नेत्यांनी आपल्या नावाआधी ‘चौकीदार’ शब्द जोडला होता.या शब्दावरून देशभर नरेंद्र मोदी सामाजिक माध्यमावर मोट्या प्रमाणात ट्रोल झाल्याचे पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौकीदार नरेंद्र मोदी. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी चौकीदार अमित शहा असे नावात बदल केले असताना सुब्रमण्यम स्वामी यांनी या मोहिमेवर थेठ हल्लाच चढविला आहे.