हैद्राबाद : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकिला काही दिवसावरचं येऊन ठेपल्या असताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. प्रत्येक राजकीय नेत्यांच्या प्रचाराला धार चढू लागली आहे.एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मोदीवर सतत हल्लाबोल करणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी मोदींच्या चौकीदार शब्दावरुन जोरदार टीकास्त्र सोडत मोदींनी माझ्याकडे यावं. मी त्यांना टोपी आणि शिट्टी देईन. अशी खरमरीत टीका ओवेसींनी केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचं ‘मै भी चौकीदार’ समाजमाध्यावर जोरात आहे. या भाजप व मोदींच्या कॅम्पेनवर सतत विरोधात वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींनी यांनी टीका केली.ते बोलताना म्हणले कि मोदींनी त्यांच्या आधार कार्ड आणि पासपोर्टवरसुद्धा चौकीदार असा उल्लेख करायला हवा. आम्हाला देशहितासाठी रोजगार देणारा पंतप्रधान हवा आहे. चहावाला पकोडेवाला नको.त्यांना चौकीदार होण्यात रस असेल तर त्यांनी निवडणूक न लढवता चौकीदारी केली पाहिजे.
गेल्या लोकसभामध्ये मोदींनी चहावाला म्हणवून घेत देशाची दिशाभूल केली होती. आता ते या लोकसभेमध्ये स्वतःला चौकीदार म्हणून घेत ते देशातील जनतेची पुन्हा एकदा दिशाभूल करू पाहतात पण देशातील जनता त्यांच्या या चौकीदारीला भीक घालणार नाही. असे ओवेसी ओवेशी म्हणाले.