नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तराखंडच्या काशीपूरमधील एका व्यक्तीने कॉलगर्ल बोलावली होती. तेव्हा ती त्याचीच पत्नी निघाली असल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. पतीने व्हाट्सअपवरून एका महिला दलालासोबत संपर्क साधून कॉलगर्लची मागणी केली. जेव्हा कॉलगर्ल आली तेव्हा ती त्याचीच पत्नी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला, हाणामारीही झाली. नंतर त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.
काहीच वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या जोडप्यातील महिलेच्या मैत्रिणीने महिलेच्या पतीला त्याची पत्नी कॉलगर्लचे काम करत असल्याचे सांगितले असता महिलेची मैत्रीण आणि तिच्यामध्ये वाद झाला होता.
पतीने दलालाशी संपर्क साधल्यावर त्या महिला दलालाने त्याला तरुणींचे फोटो पाठवून त्याला त्यातील एखादी तरुणी निवडून तिचा फोटो पाठवण्यास सांगितले. त्यात पतीने आपल्या पत्नीला शोधून तिचा फोटो पाठवला. तसेच त्या महिला दलालाचा नंबर महिलेच्या मैत्रिणीनेच दिला होता. पतीने फोटो पाठवून भेटण्याचा पत्ताही पाठवला. नंतर त्याचीच पत्नी कॉलगर्लच्या रूपात समोर आली आणि दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. तसेच पतीने पत्नी करत असलेल्या प्रकारची माहिती दिली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.