बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मागील निवडणुकी पेक्षाही घवघवीत यश मोदी सरकारला मिळाले आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल दिग्दर्शक अनुराग कश्यप याने पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्याच वेळी त्यांनी माझ्या मुलीला धमकावणाऱ्या तुमच्या समर्थकांना कशाप्रकारे तोंड द्यायचे हे ही आम्हाला सांगा असाही टोलाही मोदींना लगावला आहे.
मोदींच्या विजयानंतर एका मोदी समर्थकाने अनुरागच्या मुलीला ट्विटवरुन अश्लील भाषेत बलात्काराची धमकी दिली आहे. याच ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत अनुरागने मोदींना सवाल केला आहे.अनुरागने शेअर केलेल्या स्क्रीनशॉर्टमध्ये चौकीदार रामसिंघ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेले अश्लील भाषेतील ट्विट दिसत आहे. यामध्ये तुझ्या बापाला शांत रहायला सांग अशी धमकी अनुरागच्या मुलीचा फोटो शेअर करत या व्यक्तीने दिली आहे.
यावर अनुरागने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे कि , ‘प्रिय, नरेंद्र मोदी सर, निवडणुकीतील विजयासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन. सर्वसमावेश विकासाचा मुद्दा आपल्या भाषणातून मांडल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यात आणि माझ्यात मतभेद असल्याने तुमचे समर्थक माझ्या मुलीला अशाप्रकारे धमक्या देऊन विजयाचा आनंद साजरा करत आहेत. कृपया तुमच्या या अशा समर्थकांशी आम्ही कशाप्रकारे वागावे हे ही तुम्ही आम्हाला सांगा.’
anurag-kashyap-congratulates-pm-modi-for-the-victory-and-asks-how-to-deal-with-his-followers-who-are-threatening-his-daughter
Dear @narendramodi sir. Congratulations on your victory and thank you for the message of inclusiveness. Sir please also tell us how do we deal with these followers of yours who celebrate your victory by threatening my daughter with messages like this for me being your dissenter. pic.twitter.com/jC7jYVBCi8
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) May 23, 2019