Honey Trap Racket Pune | ‘हनी ट्रॅप’ करणार्‍या तरुणीने मांजरीतील तरुणालाही 20 लाखांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड

honey trap racket pune shocking case of honey trap girl stealing rs 20 lakh from a youth

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Honey Trap Racket Pune | पनवेल येथील व्यावसायिकाला हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्याला लुबाडणार्‍या टोळीतील तरुणीने मांजरी येथील एका 20 वर्षाच्या तरुणालाही असे अडकवून त्याच्याकडून तब्बल 20 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक (Honey Trap Racket Pune) प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor) एक युवती, तौफिक शेख, मंगेश कानकाटे, शुभम कानकाटे, साईराज कानकाटे, ऋतुराज कांचन, बंटी आमले, प्रतिक लांडगे, युवतीचा भाऊ आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवती व तिच्या साथीदारांवर कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) यापूर्वी अटक केली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हा प्रकार 15 ते 20 ऑक्टोंबर 2020 दरम्यान घडला होता. मांजरी येथील 20 वर्षाच्या तरुणाची रोहिणी भातुलकर हिच्याबरोबर इंस्ट्राग्रामवर ओळख झाली होती. तिने उरुळी कांचन (uruli kanchan) येथे भेटण्यास बोलावले. त्यांच्या भेटण्याची व्यवस्था ऋतुराज कांचन याने करुन दिली. युवतीने फिर्यादी याच्याबरोबर जबरदस्तीने शरीरसंबंध करण्यास भाग पाडले. त्यानंतर तौफिक शेख व इतर साथीदारांना तिने बोलावले. त्यांनी फिर्यादी याला मारहाण करुन त्याच्या खिशातील पाकीटातील 3 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी याला जबरदस्तीने गाडीत घालून यवत पोलीस ठाण्याच्या समोर नेले. तेथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखविली. फिर्यादी याला इतर आरोपींशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर तडजोड करुन बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर 50 लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली. त्यानंतर तडजोड करुन 20 लाख रुपये फिर्यादीकडून स्वीकारले आहे. फिर्यादी हे घाबरले असल्यामुळे तसेच समाजात बदनामी होईल, या भितीने त्यांनी तक्रार दिली नव्हती. आता पोलिसांनी या टोळीला अटक केल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी पुढे येऊन फिर्याद दिली आहे.

Web Title :- pune crime one more crime register on businessman nanasaheb gaikwad of aundh pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Corona Vaccine | अलर्ट ! कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 10 लक्षणे दिसताच व्हा सावध, धोक्याचा आहे संकेत

Pune Rural Police Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल ! 33 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, 13 निरीक्षक, 9 API आणि 11 PSI चा समावेश