भोकर : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – भोकर शहरात कडकडीत बंद ठेऊन त्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यामध्ये सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की
४३ सीआरपीएफ जवानांचा बळी घेणाऱ्या दहशतवादाविरुध्द कडकडीत आक्रोश होता. नांदेड शहर आणि जिल्ह्यात या संदर्भाने काल आणि आज विविध कार्यक्रम राबवून जनतेने आपला रोष व्यक्त केला. आज १७ फेब्रुवारी रोजी भोकर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सोबतच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी आसमंत गडगडले.
कश्मिरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यावर आरडीएक्स भरलेले चार चाकी वाहन आदळवून मोठा स्फोट घडलवला. या स्फोटात जवळपास ४३ जवांनाना शहीदी प्राप्त झाली. स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी हजर असलेल्या इतर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यावर जोरदार गोळीबार केला. देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेने प्रत्येक भारतीयांच्या मनात आजच बदला हवा अशी भावना तयार झाली. भोकर शहरात या संदर्भाने बॅनर लावून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना याची किंमत मोजावी लागेल असे निर्वाणीचे शब्द वापरून जोरदार धक्का पंतप्रधान मोदींनी दिला. आज भोकर शहरात सकाळपासूनच बंद पाळण्यात आला. सर्व राजकीय पक्ष आणि जनता आपोआपच या बंदमध्ये सहभागी झाली आणि काफीला निघाला. वंदे मातरम, भारत माता की जय , पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणांनी आसमंताला सुध्दा अश्रु आले असतील. जनतेने सुध्दा आपली कमाई, कामकाज झुगारून बंदमध्ये पूर्णपणे सहभाग घेतला.