मालवण : बहुजननामा ऑनलाईन – काळसे गावात एका मागासवर्गीय महिलेचे निधन झाले. मात्र सार्वजनिक स्मशानभूमीत तिच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. अखेर मृत महिलेच्या कुटुंबीयांना आपल्या घर परिसरातील जागेत अंत्यविधी करावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पुरोगामी महाराष्ट्रात ही बाब निंदनीय असून याची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य अजिंक्य पाताडे यांनी केली. यावर गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी याप्रकरणी गावचे सरपंच, सदस्य, प्रमुख गावकरी तसेच संबंधित ग्रामस्थांची बैठक घेत सुनावणी घेतली जाईल. यात जर सार्वजनिक स्मशानभूमी असल्यास त्याठिकाणी कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचे अत्यंविधी, दफन करण्यास आडकाठी करता येणार नाही अशा सूचना दिल्या जातील असे स्पष्ट करण्यात आले.काळसे गावात सत्यवती काळसेकर या वृद्ध महिलेचे निधन काही दिवसांपूर्वी झाले. त्यांच्या घरालगतच्या परिसरात पूवीर्पासूनची एक स्मशानभूमी होती. त्याला कुंपण घालण्यात आले. त्यामुळे या महिलेचा मृतदेह अन्य सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेला असता त्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. या प्रकारामुळे वादंग होऊ नये म्हणून अखेर त्या महिलेच्या कुटुंबीयांवर घराच्या मागील जागेत अंत्यविधी करावा लागला. या भागात अन्यही काही वयोवृद्ध महिला असून एखाद्याप्रसंगी वाडीत निधन झाल्यास त्यांच्यावर अंत्यविधी करायचा कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या समस्येकडे गांभीयार्ने लक्ष पुरवावे अशी मागणी सदस्यांनी केली. पराडकर यांनी याप्रकरणी गावातील सरपंचासह, प्रमुख गावकरी, ग्रामस्थांची सुनावणी घेतली जाईल. सार्वजनिक स्मशानभूमी असल्यास तेथे कोणत्याही धर्माच्या व्यक्तीस आडकाठी करता येणार नाही अशा सूचना दिल्या जातील असे स्पष्ट केले.