पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्याच्या शनिवार वाड्यात झालेल्या एल्गार परिषद खटल्याची ८ मार्च रोजी वरवरा राव आणि अन्य ८ जणांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण परेरा, वर्णन गोन्साल्विस आणि पाहिजे असलेला माओवादी नेता गणपतीचा समावेश आहे.
पुणे पोलिसांनी तपासादरम्यान सर्व संशयित आरोपींविरुद्ध भूमिगत चळवळीसाठी पैसे गोळा करणे आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी त्यांच्या विरुद्ध कट रचणे, देश विरुद्ध कायवया करणे ,
आरोपपत्रानुसार वरवरा राव, अनिल सुरेंद्र गडलिंग यांनी माओवाद्यांना भारतीय सुरक्षा दलांच्या संदर्भात महत्त्वाची गोपनीय माहिती पुरवली होती. या माहितीच्या आधारे माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर हिंसक हल्ले केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचा दावाही पुणे पोलिसांनी केला आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.