आर्श्‍चयकारक ! ‘त्यानं’ चक्‍क विधवा महिलेला करोडपती बनवत तिला ठेवलं अनुदानापासून ‘वंचित’

certificate
August 2, 2019

अयोध्या बहुजननामा : भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला तरी दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढत चालले आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे लाच देण्यास नकार दिल्याने लेखापालाने विधवा महिलेला खोटे उत्पन्न प्रमाणपत्र देऊन महिलेची फसवणूक केली. उत्पन्न प्रमाणपत्र बनविण्यास गेलेल्या या विधवेला लेखापालाने करोडपती असल्याचे प्रमाण पत्र देऊन सरकारी अनुदान मिळण्यापासून वंचित ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तारा देवी असे या फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.

आपल्या मुलाला शिष्यवृत्ती मिळावी म्हणून तारा यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवलेल्या होत्या. परंतु क्लार्क ने त्यांच्याकडेच पैशांची मागणी केली. परंतु त्यांनी लाच देण्यास नकार दिला. त्यांना उत्पन्न प्रमाणपत्र मिळाले खरे पण करोडपती असल्याचे. प्रमाणपत्रावर ५ कोटी रुपये उत्पन्न बघून तारा यांनी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे.

लेखापालने तारा देवी यांचे महिन्याचे उत्पन्न ४३ लाख ३३ हजार ७६६ रुपये तर वार्षिक उत्पन्न ५ कोटी २० लाख एवढे दाखवले. जेणे करून त्यांच्या मुलाला शिष्यवृत्ती मिळणार नाही आणि सरकारी अनुदानाचा देखील लाभ घेता येणार नाही. त्यात महत्वाची बाब म्हणजे प्रमाणपत्र शिष्यवृत्ती अर्जाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३० जुलै रोजी देण्यात आले , त्यामुळे त्यांना अर्ज देखील करता आला नाही.

तारा देवी यांनी मुख्यमंत्री पोर्टल वर तक्रार दाखल केल्याने , तहसील कार्यालयात एकाच प्रकारचा उडाला गोंधळ आहे. परंतु लाच मागितलेल्या धीरेंद्र प्रताप या लेखापाला विरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.