पटना बहुजननामा : बिहार पोलिसांनी पाकिस्तान समर्थन ग्रुप चे संचालन करणाऱ्या बेतिया शहरातील युवकाला अटक केली आहे. सद्दाम कुरेशी (वय २२ ) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव असून “पाकिस्तान जिंदाबाद ” या नावाने सद्दाम वॉट्सअप ग्रुप चालवत होता. तोच या ग्रुप चा ऍडमिन होता. पोलिसांनी वॉट्स अप ग्रुप चालू असलेला मोबाईल देखील सीज केला आहे.
पोलिसांनी सद्दाम विरोधी कट रचणे, देशाच्या एकता आणि अखंडतेला नुकसान पोहचविणे या कलमात गुन्हा दाखल केला आहे. सद्दाम कुरेशी चे पाकिस्तान सोबत संबंध असल्याची शंकाही पोलिसांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना उघडकीस आली होती. एका महिला शिक्षिकेला कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती. त्या महिलेला सोशल मीडिया वर पाकिस्तान समर्थन पोस्ट टाकल्याप्रकरणी देशद्रोही प्रकरणात अटक केली होती.
अजून एक घटना मुंबईतील नालासोपारा परिसरातील आतंकवादी हल्ल्या संदर्भातील संदेश सोशल मीडिया वर वायरल होत होते. ज्यामध्ये राधा नगर आणि ओसवाल नगर येथील हल्ल्यांचा उल्लेख दर्शविला होता. पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकून देखील त्यांच्या हाती अपयश आले. परंतु लोकंमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अश्या अफवा पसरवल्या जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.