नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जीवन विमा महामंडळ पेन्शनसाठी ‘जीवन शांती योजना’ देते. या योजनेनुसार आपण पेन्शन पर्याय त्वरित निवडू शकता किंवा वार्षिक पर्याय निवडू शकता. मागील वर्षी नुकतीच सुरू करण्यात आलेली ही पेन्शन योजना आपल्याला आयुष्यभरापर्यंत तुम्हाला निश्चित पेन्शन देते. पॉलिसीधारकही या निवृत्तीवेतन योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज करु शकतात. जर तुम्ही ही पेन्शन योजना ऑनलाईन खरेदी केली तर तुम्हाला त्यावरील २ टक्के वार्षिक रक्कमही मिळेल. या योजनेंतर्गत निवृत्तीवेतनधारकांना आयकर कायदा १९६१ अंतर्गत करात सूट मिळेल. या योजनेंतर्गत त्वरित एन्युटी (वार्षिक ठराविक रक्कम) पुढच्या महिन्यापासून मिळू शकते ज्यात आपल्याला न्युइटीसाठी ७ पर्याय आहेत.
एका निश्चित पेन्शनवर आयुष्यभर पेन्शनचा लाभ –
या योजनेवर आपण ५, १०, १५, किंवा २० वर्षे पेन्शन आणि त्यानंतर आपण जीवंत असेपर्यंत पेन्शनचा लाभ घेऊ शकता. आजीवन पेन्शनबरोबरच पेन्शनरच्या मृत्यूच्या वेळी खरेदीच्या किंमतीवर परतावा देण्याची सुविधादेखील उपलब्ध असेल.
आजीवन पेन्शन दरवर्षी ३% ने वाढविण्याचा पर्याय –
पेंशन फॉर लाइफ, यामध्ये पेंशनदाराच्या मृत्यूनंतर पती-पत्नीला ५० % निवृत्तीवेतनाचा पर्याय आहे.
पेन्शन फॉर लाइफ, ज्यामध्ये पेंशनदाराच्या मृत्यूनंतर पती-पत्नीला १००% पेन्शन देण्याचा पर्याय आहे.
पेन्शनधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर पेन्शनधारकाच्या शेवटच्या वारसदाराच्या मृत्यूवर खरेदी किंमत परत केली जाईल.
आपल्याकडे डिफर्ड एन्युइटीमध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत-
यामध्ये पहिल्या पर्यायांतर्गत निवृत्तीवेतनाचे आयुष्य होईपर्यंत निवृत्तीवेतनाचाच पर्याय आहे, किंवा आपण जॉईंट आयुष्याची निवडदेखील करू शकता.
- आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे
- रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी
- महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे
- ‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’
- पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम
- आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ