बहुजननामा ऑनलाईन टीम – सुनेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना हैद्राबाद येथे घडली आहे. हैद्राबाद येथील हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशाने हुंड्यासाठी सुनेला मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. पीडित सुनेने या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला आहे.
सिंधू शर्मा यांनी २७ एप्रिल रोजी हैद्राबादच्या सेंट्रल क्राइम स्टेशनमध्ये सासरच्या लोकांविरोधात शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीत तिने न्यायमूर्ती राममोहन राव, तसेच त्यांची पत्नी नुती दुर्गा जया लक्ष्मी आणि पती नुती वसिस्ट यांच्यावर हुंड्यासाठी तिचा ४ वर्षांपासून छळ केला जात आहे असा आरोप केला होता.
If every victim speaks out in the open,the number of domestic violence cases in India will be in millions every month.
This video is different because the old man who is assaulting a woman is said to be a Retd HC judge.Let’s digest it.He was a SC Judge
pic.twitter.com/T4HGEVBfTz— Ravi Nair (@t_d_h_nair) September 20, 2019
घटस्फोटासाठी सिंधू यांचे पती नुती वसिस्ट यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. सिंधूने या अर्जानंतर एक सीसीटीव्ही व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओ मध्ये घरातील लोक सिंधूशी वाद घालताना दिसत आहेत. तसेच या व्हिडिओत तिचे सासरे आणि पती मारहाण करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सासू त्यांना भडकवताना दिसत आहे. या सर्वातून सिंधू स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
हैद्राबाद उच्च न्यायालयात राममोहनराव वरिष्ठ न्यायाधीश होते आणि २०१६ मध्ये हैद्राबाद उच्च न्यायालयातून त्यांची बदली झाली. मद्रास उच्च न्यायालयाच्या सेवेत असताना ऑगस्ट २०१७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते.