मुंबई बहुजननामा ऑनलाईन – ग्रामीण आणि आदीवासी भागात रोजगार वाढीसाठी सरकारने प्रोत्साहन योजना सुरु केली आहे. खादी आणि ग्रामोद्योग विभागाने गेल्या दोन वर्षात राज्यातील शेतकरी, बेरोजगार तरुणांना मधमाशी पालनासाठी लाखांहून अधिक बॉक्सेसचे वितरण केले होते. हनी मिशनद्वारे व्यवसाय सुरु करण्याची संधी तरुणांना आहे. हनी हाऊस आणि मध निर्मिती करण्याचा प्लांट सुरु करून तुम्ही दरमहा १ लाखापेक्षा जास्त उत्पन्न घेऊ शकता.
काय़ आहे हनी मिशन ?
खादी व ग्रामोद्योग विभागाने हनी मिशन योजना सुरु केली असून त्याद्वारे शेतकरी आणि व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी हा व्यवसाय मोठी कमाई करून देईल. या माध्यमातून बऱ्याच जणांना रोजगार मिळाला आहे.
एवढी मिळते सबसिडी
या योजनेअंतर्गत हनी प्रोसेसिंगचा प्लांट लावण्यासाठी कमिशनकड़ून तुम्हाला ६५ टक्के कर्ज मिळते. त्यात खादी ग्रामोद्योगकडून २५ टक्के सब्सिडी मिळते. म्हणजे केवळ १० टक्के गुंतवणूक तुम्हाला करावी लागते.
किती लागते भांडवल ?
केव्हीआयसीच्या सांगण्यांनुसार तुम्हाला वर्षाला २० हजार किलो मध बनविण्याचा प्लांट सुरु करायचा असल्यास २४ लाख ५० हजार रुपये खर्च येतो. या खर्चात जवळपास १६ लाख रुपये कर्ज मिळेल. मार्जिन मनी म्हणून ६ लाख १५ हजार रुपये मिळतात. त्यात तुम्हाला फक्त २ लाख ३५ हजार रुपये गुंतवावे लागतील.
किती होतो नफा ?
वर्षाला २० हजार किलो मध तयार केल्यास प्रति किलो २५० रुपयांप्रमाणे ४ टक्के तोटा धरून ४८ लाख रुपये मिळतील. त्यात ३४. १५ लाख रुपये इतका खर्च वजा केल्यास वर्षाची कमाई १३.८५ हजार रुपये होईल. म्हणजे दर महिन्याला १ लाख रुपये कमाई मिळेल.