नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (ईपीएफओ) आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) या सामाजिक सुरक्षा संस्थांना कंपन्यांमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने सरकारने मसुदा जारी केला आहे. त्याअंतर्गत या संस्थांमध्ये प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) यांची नेमणूक केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा मसुदा ईपीएफओ आणि ईएसआयसीची रचना बदलण्याविषयी जारी करण्यात आला आहे. सध्या या दोन्ही संस्थाचे रुपांतर कंपनीत केले जाणार आहे. मसुद्यातील नियमांनुसार संस्थाचे रुपांतर कंपनीत झाल्यावर या कंपन्यांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नियुक्तीही केली जाईल. यात सीईओ सुद्धा नियुक्त केले जातील. जे कंपनीचे कार्यकारी प्रमुख असतील. यानां संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेनंतर भारतीय प्रशासन सेवेत नियुक्त केले जाईल.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने या संदर्भात सामाजिक सुरक्षा कोड २०१९ चा मसुदा जारी करण्यात आला असून यावर संबंधित पक्ष आणि सामान्य लोकांना २५ ऑक्टोबरपर्यंत आपल्या सुचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. इपीएफ (EPF)च्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ८.६५ % व्याज मिळेल. लवकरच नोकरी करणाऱ्याच्या खात्यातही पी. एफ चे पैसे जमा होतील. मागच्या सहा महिन्यांपासून व्याज दर देण्याबाबत निश्चय करण्यात आला नव्हता.या आधी २०१७-१८ मध्ये व्याज दर ८.५५ % होता. म्हणजेच व्याजदरात ०.१० % वाढ करण्यात आली.
Visit : bahujannama.com