बहुजननामा ऑनलाईन – बायोमॅट्रीक ओळख क्रमांक’ असलेला ‘आधार’ आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं अर्थात सीबीडीटीनं घेतलाय. पुढील सहा महिन्यांसाठी म्हणजे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ही मुदत वाढवण्यात आलीय. दरम्यान, यापुढं आयकर भरण्यासाठी आधार आणि पॅन क्रमांकाची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलंय. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
करदात्यांनी आपापली पॅनकार्ड आपल्या आधारकार्डशी संलग्न करणे गरजेचे आहे. काही करदात्यांनी अजून ही दोन्ही कार्ड संलग्न केलेली नाहीत. त्यामुळे ही मुदत वाढवणे गरजेचे असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले. गेल्या वर्षी जुलैमध्ये आयकर विभागाने पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याची मुदत आधी ३० जून २०१८ आणि त्यानंतर वाढवून ती३१ मार्च २०१९ केली होती.